मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण; आता ‘या’ व्यक्तीची होणार चौकशी

मुंबई | मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आता या प्रकरणी अभिनेता शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीची चौकशी करण्यात येणार आहे.

मॅनेजर पूजा ददलानीला मुंबई पोलिसांनी समन्स जारी केलं आहे. पूजा ददलानीला शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं  मात्र प्रकृती ठीक नसल्याचं सांगत पूजाने मुंबई पोलिसांकडे वेळ मागून घेतला आहे.

मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी सध्या एनसीबी आणि मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. एनसीबीची एसआयटीदेखील याप्रकरणाची चौकशी करत आहे.

पूजा ददलानी आणि किरण गोसावी यांच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झाली असल्याचा संशय आहे. याआधी शाहरूखची मॅनेजर पूजा मुंबई पोलिसांना सीसीटीव्हीतून दिसली होती. याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 6 प्रकरणांची चौकशी एनसीबीचं एसआयटी पथक करणार आहे. रविवारी प्रकृती ठिक नसल्याची सबब देत आर्यन खान एनसीबी चौकशीला गौरहजर राहिला.

एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचं पथक शनिवारी मुंबईत दाखल झालं होतं. त्यानंतर एक दिवसांनी एसआयटीकडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह सहा प्रकरणांचा तपास सोपवण्यात आला आहे.

या पथकात एक एडी, दोन एसपी, 10 आयओ आणि जीआयओ आहेत. दुसरीकडे एनसीबी अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांची चौकशी करण्यासाठीही एक पथक मुंबईत दाखल झालं आहे.

दरम्यान, एनसीबीच्या एसआयटीनं क्रूझ ड्रग प्रकरणी रविवारी आरोपी अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांचा जबाब नोंदवला. एसआयटी ज्या 6 प्रकरणांचा तपास करत आहे.

जेवढे आरोपी आहेत, सर्वांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. या 6 प्रकरणांमध्ये आर्यन खान, समीर खान, अरमान कोहली, मुंब्रा येथील प्रकरण ज्यामध्ये MD ड्रग्स जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच जोगेश्वरी येथील प्रकरण ज्यामध्ये 1 किलो चरस जप्त करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या 

वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ 

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी 

“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा” 

येत्या 24 तासात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा