“या लढ्यात मी एकटा नाही, मुख्यमंत्री आणि शरद पवारही माझ्यासोबत आहेत”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे. नवाब मलिक रोज नवनवीन गौप्यस्फोट करत आहे. त्यामुळे मलिक आज काय गौप्यस्फोट करणार, आज कोणावर आरोप करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून असतं.

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावरुन तर नवाब मलिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच लावली आहे. याशिवाय त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. विशेष करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आहे.

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक करत असलेल्या खुलास्यांवर मुख्यमंत्र्यांनीही त्याचं कौतुक केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं गुड गोईंग अशा शब्दात कौतुक केलं आहे.

आता नवाब मलिकांनी कोण कोण आपल्याला पाठिंबा देत आहे याविषयी वक्तव्य केलं आहे. माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे, तसे पक्षप्रमुख शरद पवार व राष्ट्रवादी पक्षही पाठिशी असल्याचं मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं.

महाराष्ट्रात जे काही वाईट आणि चुकीचं घडत आहे त्याला उघडं करण्याची, समोर आणण्याची जबाबदारी माझी आहे, असं मलिकांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. या लढ्यात मलिक एकटे पडले असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच त्यांनी आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

चुकीचे करत असलेल्यांना दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. अनेकजण म्हणातात मलिक या लढाईत एकटे आहेत. तर त्यांना मी त्यांना सांगू इच्छितो की, या लढाईत मी एकटा नाही, माझ्यासोबत माझा पक्ष, शरद पवार, उद्धव ठाकरे असे सर्वचजण सोबत आहे.

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह भाजप नेत्यांवर आरोपांची मालिकाच लावली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरण आता हळूहळू मलिक-फडणवीस यांच्या वादावर येऊन थांबलं आहे. दोघेही एकमेकांवर अनेक गंभीर आरोप करत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –  

  “तुमच्याकडं चाणक्य तर आमच्याकडं लाल मातीतला बाप आहे”

  मोठी बातमी! गुजरातमधून 350 कोटींचं ड्रग्ज जप्त

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली”