“देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”

नवी दिल्ली | आपल्या देशाला 1947 मध्ये मोठ्या लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आहे. या लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. पण या सर्वांच्या बलिदानाला भिक असं संबोधण्याचं धाडस प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावतने केलं आहे.

कंगणा राणावत नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत असते. आपल्या बेबाक बोलण्याच्या नादात ती कधी कोणालाही कुठेही काहीही बोलून दुखवू शकते.

कंगणा राणावतने एका कार्यक्रमात देशाला 1947 मध्ये भीक मिळाली होती स्वातंत्र्य नाही असं म्हटलं आहे. तर खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचा दावा कंगणा राणावतने केला आहे.

कंगणाच्या या वक्तव्यानंतर सध्या देशभर कंगणाच्या विरोधात वातावरण पेटलं आहे. कंगणा राणावत पंतप्रधान मोदींची स्तुती करण्याच्या नादात देशाचा अपमान केला आहे.

कंगणा नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणीत येते. मात्र यावेळी तीनं चक्क देशाच्या स्वातंत्र्याचा अपमानं केल्यानं सोशल मीडियावर कंगणाचा मोठी विरोध केला जात आहे.

नुकताच राष्ट्रपती भवनात नागरी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आहे. या सोहळ्यात कंगणाला पद्मश्री या नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. या पार्श्वभमीवरच कंगणा एका कार्यक्रमात बोलत होती.

रक्त हे वाहणार होतं. पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं त्यांनी त्याची किंमत मोजली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य यावेळी कंगणा राणावतने केलं आहे.

कंगणानं याच कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान सुपरस्टार असल्याचंही वक्तव्य केलं आहे. कंगणाच्या मते देशात खरं स्वातंत्र्य मोदी पंतप्रधान झाल्यापासून मिळालं आहे.

कंगणाच्या या वक्तव्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. कंगणाला देशद्रोही ठरवण्यात येत आहे. कंगणानं देशाची आणि स्वातंत्र्य संग्रामातील विरांची माफी मागावी, अशी मागणी देशभरातून होत आहे.

दरम्यान, कंगणा राणावतनं स्वातंत्र्याचा अपमान केला त्यावेळी उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्यानं त्या सर्वांवर देशभरातून टीका करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

  फडणवीस म्हणाले ‘डुकराच्या नादी लागायचं नाही’, आता नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली” 

मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’