मुंबई | हटके भूमिकांसाठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अपारशक्तीने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
नुकताच त्याचा ‘हेल्मेट’ हा चित्रपट झी 5 वर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अपारशक्तीने कंडोम विकणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये अपरशक्ती हेल्मेट घालून कंडोम विकताना दिसतो.
अशातच आता अपारशक्तीने एका मुलाखतीमध्ये चित्रपटात साकारलेल्या भूमिकेविषयी काही खुलासे केले आहेत. या मुलाखतीत अभिनेत्याने दिलखुलासपणे गप्पा मारल्या आहेत. यावेळी अपारशक्तीने आपल्या आयुष्यातील काही हटके अनुभव देखील शेअर केले आहेत.
तसेच हा चित्रपट म्हणजे आपलाच बायोपिक असल्याचं देखील अभिनेत्याने मिश्कीलपणे म्हटलं आहे. यावेळी बोलताना अपारशक्ती खुराणा म्हणाला की, पूर्वी डिलिव्हरी बॉईज कंडोमचं पाकीट डिलिव्हरी करण्यासाठी येत होते. ते इतके घाईत असायचे की गाडीवरूनच हेल्मेट न घालता पाकीट देवून निघून जायचे.
मी कॉलेजमध्ये असताना पहिलं कंडोमचं पाकीट खरेदी केलं होतं. मी ज्यावेळी पहिलं कंडोमचं पाकीट खरेदी केलं त्यावेळी मी देखील हीच ट्रिक वापरली होती. मी कंडोमचं पाकीट खरेदी करायला गेल्यानंतर पटकन माझी बाईक पार्क केली आणि हेल्मेट न काढताच कंडोम खरेदी करायला गेलो. पटकन कंडोम घेतलं आणि तिथून निघालो, असा किस्सा अपारशक्तीने यावेळी शेअर केला आहे.
पुढे बोलताना तो म्हणाला की, त्यावेळी मला काय कल्पना होती की पुढे जावून सिनेमात देखील की हेच करेल. परंतु फरक फक्त एवढाच आहे की त्यावेळी मी कंडोम विकत घेत होतो आणि सिनेमात विकत आहे.
दरम्यान, अपारशक्ती काही दिवसांपूर्वीच एका मुलीचा पिता झाला आहे. त्याने आपल्या मुलीचं नाव आरझोई असं ठेवलं आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने चाहत्यांना ही बातमी दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
अचानक अस्वल चढलं गाडीवर अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ
झोपलेल्या चिमुकल्या जवळ जाऊन कुत्र्यानं जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हायरल व्हिडीओ
काय सांगता! माणसांप्रमाणे चक्क पक्षीही करतोय चोरी, पाहा व्हिडीओ
ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
‘मी नास्तिक आहे, धर्मामुळे माझी…’; सैफ अली खानचं वक्तव्य पुन्हा चर्चेत