“मी नेहरू यांच्यावर टीका केली नाही, घराणेशाही असलेले पक्ष लोकशाहीसाठी घातक”

मुंबई | संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर देखील वक्तव्य केलं होतं.

अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी मी कधीच कुणाच्या वडिलांबद्दल, आई आणि आजोबांबद्दल बोललो नाही, असं म्हटलं आहे.

देशाच्या माजी पंतप्रधानांनी काय म्हटलं होतं, तेच समोर मांडलं. त्यावेळी पंतप्रधानांचे विचार काय होते, त्यावेळी काय परिस्थिती होती आणि त्यांचे काय विचार होते, हे मी सांगितलं, असंही मोदी म्हणाले आहेत.

घराणेशाही असलेले पक्ष हे लोकशाहीला घातक असल्याचं म्हणत त्यावेळी मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. एखादं कुटुंब हे पक्षाची सर्वोत्तम गरज बनते तेव्हा परिवार वाचवा आणि पक्ष वाचला नाही तरी चालेल, देश वाचला नाहीतरी चालेल, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केलीये.

पक्ष, परिवार, देश वाचला नाहीतरी चालेल. असं जेव्हा असेल तेव्हा देशाचं जास्त नुकसान होतं, असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी लखीमपूर घटनेवर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच मांडली भूमिका आहे.

या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले त्याला योगी सरकारने पूर्ण सहमती दर्शवली असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नरेंद्र मोदी यांचा ही मुलाखत आता कितपत भाजपसाठी यशस्वी ठरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

काय सांगता! पुरुष नसलेल्या गावात Pregnant होतात महिला, कारण वाचाल तर…

“संजय राऊत… बाहेर नाही तर ‘आत’ जाण्याची वेळ आलीये, आता धमक्या देणं बंद करा”

लता मंगेशकरांच्या निधनानंतर ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…

“10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार…”

 “माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”