कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर WHO ने दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोना रूग्णसंख्येत सातत्यानं चढ-उतार पहायला मिळत आहेत. जागतिक स्तरावर कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटनं मोठा धुमाकूळ घातला आहे. परिणामी सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.

जागतिक आरोग्य संघटना सध्या सर्व प्रकारच्या कोरोना रूग्णांवर लक्ष ठेवून आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनानं अनेकदा नवीन व्हेरियंटमुळे सर्वांचं टेन्शन वाढवलं असताना आता नवीन माहिती समोर येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक विभाग प्रमुख मारिया वैन केर्खोव यांनी महत्त्वाची माहिती सध्या सांगितली आहे. कोरोनाच्या सर्व व्हेरियंटप्रमाणं ओमिक्राॅनबाबतही संशोधन चालू आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून अचानकपणे जगामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढायला लागली होती. परिणामी अनेक देशांमध्ये निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. अशात जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी मारिया वैन केर्खोव यांनी संशोधनाच्या आधारावर माहिती दिली आहे.

ओमिक्राॅन या व्हेरियंटच्या बदलत्या स्वरूपावर आम्ही सर्वजण लक्ष ठेवून आहोत. ओमिक्राॅन व्हेरियंटचा प्रादुर्भाव जगात विविध देशामध्ये झाला आहे. परिणामी सध्या जागतिक आरोग्य संघटना यावर अधिक संशोधन करत आहे, असं मारिया वैन केर्खोव म्हणाल्या आहेत.

आम्हाला आता या विषाणूबद्दल बरेच काही माहित आहे, तथापि, आम्हाला सर्वकाही माहित नाही. अगदी स्पष्टपणे सांगायचे तर, व्हायरसचे हे रूप ‘वाइल्ड कार्ड’ आहेत, असं मारिया वैन केर्खोव म्हणाल्या आहेत.

सध्याच्या या परिस्थितीत, आम्ही या विषाणूवर सतत बारकाईने लक्ष ठेवतो, तो कसा बदलतो आणि त्याचे स्वरूप कसे बदलते. तथापि, या विषाणूमध्ये बदल होण्याची शक्यता खूप आहे, असं गंभीर वक्तव्य देखील केर्खोव यांनी केलं आहे.

दरम्यान, मारिया वैन केर्खोव यांनी महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं काम केलं आहे. त्यांच्या नेतृत्वात एक गट सातत्यानं ओमिक्राॅनवर लक्ष ठेवून आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार…”

 “माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”

ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, इथे दादागिरी चालणार नाही” 

“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही” 

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी….’; संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट