“…तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, बायकापोरांसह सगळे मुंबईत या”

मुंबई | राज्याच्या वाहतूकीची जीवनवाहिनी म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरीला ओळखलं जातं. पण लालपरी सध्या रस्त्यावर धावताना दिसत नाहीयं.

लालपरीच्या धावण्यात ज्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे ते कर्मचारी सध्या संपावर आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीचा कारभार योग्य  प्रकारे संभाळत नसल्याचा आरोप सध्या केला जात आहे.

अपुऱ्या सुविधा, कमी पगारी, अनियमीत पगार, या सर्व समस्यांनी लालपरीला घेरलं आहे. परिणामी लालपरीच्या सरकारमध्ये विलीनिकरणाची गरज आहे, असं कर्मचारी सांगत आहेत.

राज्यातील सर्व आगारात सध्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. याचा थेट फटका राज्यातील प्रवास्यांना होतं आहे. दिवाळीपासून सुरू झालेला संप अद्यापही संपला नसल्यानं सध्या राज्यात प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होतं आहे.

एसटी कामगारांच्या संपाला सध्या विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ऐनदिवाळीत एसटी कर्मचारी आपल्या मुला बाळांसह रस्त्यावर उतरले आहेत. अशातही सरकार झोपेचं सोंग घेऊन बसलंय, अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे.

एसटी कर्मचारी आपल्या बायकापोरांसह आझाद मैदानात आले आहेत. आता न्याय मिळाल्याशिवाय थांबायचं नाही, अशी गर्जना पडळकर यांनी केली आहे. आझाद मैदानावर एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत.

राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र चालू आहे. परिणामी राज्यातील परिस्थीती चिघळण्याची चिन्हं आहेत. अशात राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्यातील बहुतांश ठिकाणची वाहतूक पुर्ण ठप्प झाली आहे. एसटीच्या बेमूदत संपावरून राज्य सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे.

राज्यातील एसटीच्या या संपाला विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा मागण्या मान्य होईपर्यंत संप चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या 

  एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…

  ‘…ते प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन दाबण्यात आलं’; मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर