“मला तो दिवस चांगला आठवतो ज्यादिवशी…”, विराट कोहलीचं भावनिक वक्तव्य

मुंबई | बहुप्रतिक्षित आयपीएलच्या आगामी सत्रासाठी मेगालिलाव होणार आहे. आयपीएल ऑक्शन काही दिवसानंतर आला असून त्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे.

आयपीएलमध्ये 2008 पासून 2022 पर्यत विराट कोहली तेव्हापासून विराट आरसीबीचा भाग आहे. विराट कोहलीने 9 वर्ष आयपीएलमध्ये आरसीबी संघाचे नेतृत्व करत आहे.

दानिश सेठसोबत आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहलीने भावनिक वक्तव्य केलं आहे. पॉडकास्टमध्ये त्यांनी कोहलीने आपल्या आरसीबी बद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मला खरेदी केलं तेव्हा माझ्या आयुष्यातला प्रभावशाली क्षण होता. मला तो दिवस चांगला आठवतो, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

भारतासाठी खेळला नसाल तर तुम्हाला किती रकमेत निवडले जाऊ शकते. मला आठवते की आमच्यासाठी तो क्षण खूप आश्चर्यकारक होता, असं विराट म्हणाला आहे.

ज्या रकमेत त्यांनी मला निवडले होते ते ऐकून मी वेडा झालो होतो. विराटला आरसीबीने 12 लाख रुपयात खरेदी केले होते, असंही तो म्हणाला आहे.

जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा जाणवत की, तेव्हा आतापेक्षा परिस्थिती खूप वेगळी होती. दिल्लीचा संघ मला खरेदी करण्यास उत्सुक होता याबाबत विराटने यावेळी सांगितले.

आरसीबीचा भाग असलेला विराटने त्याच्या 15 वर्षाच्या अनुभवाबाबत विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला तो दिवस चांगला आठवतो अंडर-19 डायनॅमिक तेव्हा थोडा वेगळा होता.

दरम्यान, तुम्ही भारतासाठी खेळला नसाल तर तुम्हाला किती रकमेत निवडले जाऊ शकते यावर तेव्हा निर्बंध होते, असंही त्याने यावेळी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“एक नाही दोन भारत झालेत, मोदी सरकारने…”; राहुल गांधींचा संसदेत भाजपवर हल्लाबोल

 BIG BREAKING: नितेश राणेंना कोर्टाचा दणका, पुढील दोन दिवस पोलीस कोठडीत मुक्काम

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता

 रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’