“अभिनेत्रींना कीस करुन मला कंटाळा आलाय, ‘सिरीअल किसर’ ही ओळख मला नकोय”

मुंबई | बॉलिवूड विश्वात अभिनेता इमरान हाशमी हा एक ‘सिरीअल किसर’ म्हणून ओळखला जातो. इमरानने आजवर अनेक चित्रपटांमध्ये किसींग सीन केले आहेत. कोणतीही पार्श्वभूमी नसताना इमरानने बॉलिवूड विश्वात आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

रॉमॅन्टीक सीन्समुळे बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या इमरानला ही ओळख आता नकोशी झाली आहे. तो आता या ओळखीला कंटाळला आहे. याबद्दल इमरानने नुकतंच एका मुलाखतीत खंत व्यक्त केली आहे.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत इमरान म्हणाला की, अभिनेत्रींना कीस करून मला कंटाळा आला आहे. आजपर्यंत किसींग सीन जास्त असणाऱ्या भूमिकाच मला मिळाल्या आहेत. सिरीअल किसर या ओळखीमुळे आता मी एक विदुषकच बनलो आहे.

सर्वत्र माझी हीच इमेज तयार झाली आहे. मीडियात देखील माझ्या याच इमेजची चर्चा चालते. परंतु सिरीअल किसर या ओळखीमुळे सर्वकाही बदलून गेलं आहे, अशी खंत इमारने या मुलाखतीत व्यक्त केली आहे.

तो पुढे बोलताना म्हणाला की, सेक्शुअलिटी दाखवणे हा आपल्या देशामध्ये गुन्हा समजला जातो. 2003 मध्ये ज्यावेळी मी चित्रपट विश्वात पदार्पण केलं त्यावेळी मी एकटाच अभिनेत्रींसोबत किसींग सीन देत होतो. यामुळे मी चर्चेचा विषय ठरलो होतो.

मला नेहमी याच भूमिका मिळत होत्या. परंतु यामुळे माझ्यातील क्रिएटीव्ह कलाकार मरत होता. त्याचं समाधान होत नव्हतं. मात्र, अशाप्रकारचे कथानक स्विकारण्याशिवाय माझ्याकडे त्यावेळी दुसरा पर्याय देखील नव्हता, असं देखील इमरानने यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘फूटपाथ’ या चित्रपटातून 2003 साली इमरानने चित्रपट विश्वात पदार्पण केलं आहे. मर्डर, गॅंगस्टर, द डर्टी पिक्चर अशा अनेक चित्रपटांमध्ये इमरानने काम केलं आहे. गेली अनेक दशके तो वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

…म्हणून मी लग्नाअगोदर गरोदर असल्याचं लपवलं होतं; नेहा धुपियाने केला खुलासा

‘बिग बाॅस ओटीटी’: बोलता बोलता शमिता राकेशला म्हणाली “इथे ये आणि आधी मला एक किस कर”, पाहा व्हिडीओ!

ड्रग्स प्रकरणात आता ‘या’ अभिनेत्याच्या घरावर छापा!

हनी सिंगच्या अडचणींत वाढ; घरगुती हिंसाचार प्रकरणी न्यायालयानं फटकारलं, म्हणाले…

भावाच्या मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडलं होतं? ऋषी कपूर यांच्या भावाने केला खुलासा