वाढदिवसाच्या दिवशी आमिर खानचा सोशल मीडियाला रामराम, शेअर केली ‘ही’ शेवटची पोस्ट

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असलेला पहायला मिळत असतो. 14 मार्चलाच आमीरने आपला 56 वा वाढदिन साजरा केला होता. काल त्याला फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेकांनी त्याच्या सोशल मीडियावर भरघोस शुभेच्छा दिल्या. देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या सर्व चाहत्यांचे आमिर खाननं आभार मानले आहेत. या वाढदिवसाला त्यानं एक संकल्प केला आहे.

आमिरने सोशल मीडियाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरने त्याची शेवटची पोस्ट शेअर करत ही बातमी त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. आपल्या चाहत्यांना निरोप देताना आणि त्यांचे आभार मानताना आमिर म्हणतो, “माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि माझ्या वाढदिवसाला माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. या सगळ्याने मला भरून येत आहे.”

तो पुढे म्हणाला, “ही माझी सोशल मीडियावरची शेवटची पोस्ट असेल. असंही मी फारच अॅक्टिव्ह होतो सोशल मीडियावर पण तरीही मी इकडून रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे.” त्याच्या ऑफिशिअल टीमचं हँडल शेअर करत आपण आता यावरून त्याच्याबद्दलचे अपडेट्स मिळतील असंही तो म्हणाला.

आमिरच्या आगामी चित्रपटांविषयी, तसेच त्याच्याविषयी अपडेट्स त्याच्या चाहत्यांना आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर पाहायला मिळतील. सोशल मीडिया आपण सोडत असलो तरी आपण कार्यरत असणार आहोतच. आपल्या प्रॉडक्शन हाऊसमार्फत आपल्या प्रोजेक्ट्सची माहिती आपण इथे देत राहूच असं त्याने सांगितलं आहे. त्याचं हे प्रॉडक्शन हाऊस लवकरच व्हेरिफाईडही होणार असल्याची माहिती त्याने दिली. एकेपीपीएल ऑफिशिअल असं त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव असणार आहे.

2018 मध्ये, आमीरने आपल्या वाढदिवशी आपल्या आईचे छायाचित्र शेअर करून इंस्टाग्रामवर डेब्यू केला होता, ज्यामुळे इंटरनेटवर त्याचा एक नवा फॅन बेस निर्माण झाला होता.

 

महत्वाच्या बातम्या –

तिनं तरुणाला खुलेआम प्रपोज केलं, पण चांगलंच महागात पडलं; पाहा व्हिडीओ

स्टेजवरंच उर्वशीसोबत जे घडू नये ते घडलं, ड्रेस खाली सरकला अन् मग…; पाहा व्हिडीओ

जसप्रीत बुमराहनं संजना गणेशनसोबत बांधली लग्नगाठ, लग्नातील फोटो व्हायरल

मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट पडणार? महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

कोरोना नियमांचं उल्लंघन करणं पडलं महागात, ‘या’ अभिनेत्रीवर झाला गुन्हा दाखल