12व्या मजल्यावर व्यायाम करत होता पठ्ठ्या… हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नये!

फरीदाबाद | व्यायाम हा अनेकांच्या आवडीचा विषय असतो. आपलं शरीर पिळदार असावं, असं सर्वांना वाटत असतं. त्यासाठी अनेकजण जीम देखील लावतात.

अशातच फरीदाबादच्या बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचा आणखी एक पराक्रम पहायला मिळाला आहे.

12 व्या मजल्यावरील बाल्कनीतून लटकून व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ ग्रेटर फरीदाबाद सेक्टर-82 च्या ग्रॅंड्युरा सोसायटीच्या ई-ब्लॉकचा असल्याची माहिती समोर आली आहे.

एक व्यक्ती सोसायटीच्या 12 व्या मजल्याच्या बाल्कनीची रेलिंग पकडून व्यायाम करताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलाय.

बाल्कनीतून लटकून त्याने काही उठाबशा काढल्या. तर काहीवेळ त्याचठिकाणी तो उभा असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर तो आत गेला.

56 वर्षीय व्यक्ती मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. त्यांना 28 वर्षांचा मुलगाही आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष दीपक मलिक यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आरडब्ल्यूएच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना त्याच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ