युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | एकीकडे जग कोरोनासारख्या महामारीशी लढत असताना युक्रेनच्या जमिनीवर मात्र सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. अमेरिका आणि रशिया या दोन्ही आर्थिक महासत्ता युक्रेन प्रश्नावर एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. परिणामी आता युक्रनेच्या प्रश्नावर जगाला कोणत्या नव्या संकटाला सामोरं जावं लागणार याची कल्पना सध्या करता येणार नाही.

युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना भारत सरकारनं सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर आता हा वाद वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. युक्रेनच्या सीमेवर लाखोंच्या संख्येनं सध्या रशियन सैन्य जमा होत आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सैन्य आपापल्या छावणीवर परत जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.

पुतिन यांच्या या घोषणेनतंरही नाटो देशांना रशियन सैनिकांच्या परतण्यावर विश्वास वाटत नाही. युक्रेन प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी व्लादिमीर पुतिन आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांच्यात चर्चा होणार आहे.

रशिया आणि जर्मनीच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये होणाऱ्या या चर्चेपूर्वीच रशियाकडून सैन्य आपल्या छावणीवर जात असल्याचं जाहीर करण्यात आल्यानं जागतिक स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार संघर्ष चालू आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं जगातील सर्व प्रमुख देश चिंतेत आहेत.

युक्रेनवर रशिया आपला ताबा प्रस्थापित करण्यास इच्छुक आहे. अमेरिका रशियाच्या या विचाराच्या विरोधात आहे. अशात आता युक्रेन प्रश्न चर्चेतून नाही सुटला तर मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

रशियाकडून सैन्य माघारी जात असल्याचं जाहीर केलं गेलं असलं तरी किती प्रमाणात सैन्य माघारी जाणार यावर काहीही बोलण्यात आलेलं नाही. परिणामी नाटो देशांना रशियाच्या या निर्णयावर विश्वास वाटत नाही.

दरम्यान, रशिया हा नैसर्गिक इंधनाचा मोठा पुरवठादार देश आहे. परिणामी युक्रेन प्रश्नावर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर या घटनेचे परिणाम सर्व देशांवर होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ

निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला