Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘माझे हजारो स्त्रियांशी शारिरीक संबंध असतील पण…’; सलमाननं त्यावेळी केले होते अनेक खुलासे, वाचा सविस्तर

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सलमान खान मुलाखती दरम्यान अनेक गोष्टी उघडपणे बोलताना आपल्याला दिसतो. माध्यमांवर सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक गोष्टी आजवर समोर आल्या आहेत. 1990 साली सलमान खाननं त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक रहस्ये एका मुलाखती दरम्यान उघडकीस आणली होती.

गॉसिप मॅगझीन मायापुरीच्या एका मुलाखतीत सलमाननं त्याच्या कारकिर्दीतील अनेक गोष्टी उघडपणे बोलून दाखवल्या होत्या. सलमान मुलाखती दरम्यान माझे हजारो स्त्रियांशी संबंध असतील, असं बोलला होता. त्यावेळी सलमाननं मुलाखती दरम्यान बोललेली ही गोष्ट माध्यमांनी चांगलीच उचलून धरली होती.

1990च्या सुमारास सलमानच्या प्रेम कथा चांगल्याच चर्चेत होत्या. त्यावेळी अशी चर्चा रंगली होती की, सलमाननं त्याची गर्लफ्रेंड संगीता बिजलानीला सोडलं आणि तो त्याची पहिली गर्लफ्रेंड शाहीनकड परत गेला. मुलाखती दरम्यान पत्रकार चंदा टंडननं याच गोष्टीविषयी सलमानला प्रश्न विचारला होता.

यावेळी सलमान खान प्रचंड रागावला होता. ‘माझं वैयक्तिक आयुष्य फक्त माझं आहे. यात कुणालाही हस्तक्षेप करायची गरज नाही. माझे हजारो स्त्रियांशी संबंध राहिले असतील पण माझ कोणतंही नात अपूर्ण राहिलेलं नाही. मी प्रत्येक संबंध पूर्ण केला आहे,’ असं सलमान रागात म्हणाला होता.

यावेळी सलमान खाननं त्याच्या लग्नाबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. सलमान खान त्यावेळी त्याला प्रथम सेटल व्हायचं आहे. तसेच स्वतःच्या घर आणि कारसह इतर गोष्टी मिळवायच्या आहेत आणि मग लग्न करायचं आहे, असं म्हटला होता.

मला एका भारतीय महिलेसारखी पत्नी हवी आहे. चालण्याची उठण्याची बसण्याची समज असलेल्या मुलीशी मला लग्न करायचं आहे, अशी इच्छा सलमाननं त्यावेळी व्यक्त केली होती. तसेच पती झाल्यावर मी एक चांगला माणूस बनू इच्छितो जो एक प्रेमी होवून मी बनू शकलो नाही, असंही सलमान खान त्यावेळी बोलला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

रिया आणि सुशांतचं ‘ते’ कृत्य व्हिडीओमधून आलं समोर; पाहा रिया आणि सुशांतचा अनसीन व्हिडीओ

सुशांत प्रकरणी रियाचा धक्कादायक खुलासा! ‘या’ व्यक्तीनं सुशांतला गां.जाची सवय लावली होती

दुचाकीला धडक देत तब्बल 4 वेळा कार हवेत उडाली अन् मग…; पाहा घटनेचा लाईव्ह व्हिडीओ

“दिल्लीत एका युवकानं पवारांना हाणलं होतं, जितेंद्र आव्हाड हे विसरलेले दिसत आहेत”

‘हे कायद्याचं राज्य आहे की एका बबड्याच्या फायद्याचं?’; ‘या’ भाजप नेत्याचा शिवसेनेला टोला