“नेत्यांना आता तोंड लपवून पळावं लागणार”; मोठा गौप्यस्फोट करण्याची घोषणा

मुंबई | राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे, त्यामध्ये या वर्षीचं विधानसभेचं हिवाळी अधिवेशनही खूप चर्चेचा विषय बनत चाललं आहे. काही राजकीय नेत्यांनी येत्या अधिवेशानात ते काय भूमिका मांडणार याविषयी सांगायला सुरूवात केली आहे.

सध्या राज्यातील विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये चांगलीच आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगत असल्याचं दिसून येत आहे. अशातच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिवाळी झाल्यानंतर काही घोटाळे बाहेर काढणार असल्याचं सांगितलं आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. सोमय्या यांनी दिवाळीनंतर ते काही घोटाळे बाहेर काढणार असल्याचं म्हटलं आहे.

परंतू त्यांची ही धमकी पोकळ असल्याचं म्हणत मलिक यांनी सोमय्या यांच्यावर चांगलाच वार केला आहे. तसेच येत्या हिवाळी अधिवेशात मीच भाजपच्या काही नेत्यांची पोल खोलणार असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे.

मी भाजप नेत्याचं पुराव्यानिशी भांडं फोडणार आहे. त्यामुळे काही भाजप नेत्यांना तोंड लपवून पळावं लागणार असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. त्याचप्रमाणे पिक्चर अजून सुरू आहे. आता फक्त इंटरव्हल झाला असल्याचंही त्यांनी म्हटलं.नवाब मलिक यांनी केलेल्या या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

सर्वत्र एकच चर्चा सुरू असल्याचं समजतं आहे. येत्या अधिवेशनादरम्यान मलिक नेमकी भाजपच्या कोणत्या नेत्यांची नावं घेणार?, असाही सवाल राज्यातून केला जात आहे. त्यामुळे यावर्षीच विधानसभेच हिवाळी अधिवेशन खूपच वादळी ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

अजून तरी या वर्षीच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेश कधी होणार? कोणत्या तारखेला सुरू होणार? किती दिवसांचं असणार? यातील कोणतीही माहिती सरकारने दिलेली नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाविषयी सरकार काय घोषणा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावरही त्यांनी हल्ला चढवला आहे.

तुमच्याकडे इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय हे सगळंच आहे. तरीही गेले सात वर्ष नवाब मलिकांविषयी शोधत आहात. अजून शोधा, परंतू मी काहीच केलेलं नाही म्हटल्यावर तुम्ही शोधून करणार तरी काय?, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“राज्यात शिवसेना- भाजपचं बहुमत होत तरीही पवारांनी सरकार बनवलं, मग हा सत्तेचा दुरूपयोग नाही?”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा वाढ, वाचा आजचा दर

कुत्र्याचा अनोखा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आर्यनच्या सुटकेवेळी चोरट्यांना सुळसुळाट, अबब… ‘या’ गोष्टींची झाली चोरी

“तुम्ही जे केले ते आता तुम्हाला भोगावं लागणार” आर्यनच्या सुटकेनंतर सर्वात मोठी प्रतिक्रिया