…तर आर्यन खानला पुन्हा होऊ शकते अटक; मोठी माहिती आली समोर

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नुकताच जामीन मंजूर झाला आहे. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून त्याची सुटका देखील करण्यात आली आहे. त्याला तुरुंगातून नेण्यासाठी स्वतः शाहरुख खान हजर होता.

न्यायालयाने आर्यन खानला जामीन दिला असला तरी आर्यन खानच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नाहीत. त्याची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे, मात्र हे सर्वस्वी आर्यन खानवरच अवलंबून आहे.

न्यायालयाने जामीन मंजूर करताना आर्यन खानला काही अटी घातल्या आहेत. या अटी पाळणे त्याच्यासाठी बंधनकारक असणार आहे. अटींचं पालन केलं नाही तर त्याला मोठ्या समस्यांचा तसेच कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो. प्रसंगी त्याला अटक देखील होऊ शकते.

या अटी पाळल्या नाही तर आर्यनला होऊ शकते अटक-

न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींना एक लाख रुपयांचा पीआर बाँड द्यावा लागणार आहे. हा बाँड एक किंवा अधिक सुरक्षा ठेवींसह सादर केले जाऊ शकतो.

NDPS कायद्यांतर्गत ज्या आधारावर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याअंतर्गत अशा कोणत्याच कार्यक्रमात त्यांना सहभाग नोंदवता येणार नाही.

आरोपीने त्याच्या सहआरोपी किंवा तत्सम कृतीत सहभागी असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करु नये, अशी अट देखील न्यायालयाने घालून दिली आहे.

आरोपीने माननीय विशेष न्यायालयाच्या कार्यवाहीच्या पूर्वी न्यायालयाच्या कार्यवाहीला बाध्य होईल किंवा अडचणीचे ठरेल असे कोणतेही कृत्य करु नये.

आरोपीने वैयक्तिकरित्या किंवा कोणत्याही माध्यमातून साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा तसेच त्यांच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करु नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करु नये.

आरोपींनी देश सोडून जाऊ नये यासाठी देखील न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. यामध्ये आरोपींना त्यांचा पासपोर्ट तात्काळ विशेष न्यायालयासमोर सादर करावा लागणार आहे, जो त्यांना लवकर मिळणार नाही.

विशेष न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या उपरोक्त कार्यवाहीच्या संदर्भात आरोपीने प्रसारमाध्यमांमध्ये कोणतेही विधान करु नये. यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियासह इतर माध्यमांचा समावेश आहे.

विशेष NDPS न्यायाधीश, बृहन्मुंबई यांच्या पूर्वपरवानगीशिवाय आरोपी देश सोडणार नाही.

जर आरोपींना बृहन्मुंबईबाहेर जावे लागले, तर ते तपास अधिकाऱ्यांना सांगावे लागेल, तसेच स्वतःच्या प्रवासाचे पूर्ण तपशील त्यांना तपास अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहेत. यात कुठलीही कसूर त्यांना करता येणार नाही.

आरोपींना दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.

कोणत्याही न्याय्य कारणाने प्रतिबंधित केल्याशिवाय, आरोपी सर्व तारखांना न्यायालयात हजर राहतील.

आरोपींना एनसीबी अधिकार्‍यांसमोर हजर राहावे लागेल. तपास करण्यासंदर्भात अशा पद्धतीचे आदेश दिले आहेत.

एकदा खटला सुरु झाल्यानंतर, अर्जदार/आरोपी कोणत्याही प्रकारे खटल्याला विलंब करण्याचा प्रयत्न करणार नाहीत याची त्यांनी काळजी घ्यावी किंवा जाणूनबुजून त्यांनी अशी कृती करु नये.

आरोपींनी यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास, NCB ला त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी थेट विशेष न्यायाधीश/न्यायालयाकडे अर्ज करण्याचा अधिकार असेल यामुळे आर्यन खानची पुन्हा तुरुंगात रवानगी होऊ शकते.

आर्यनच्या खानची कारागृहातून सुटका कशी झाली वाचा-

5:30 AM: तुरुंगातील जामीन पेटी उघडली आणि आर्यनच्या सुटकेचा आदेश काढला गेला.

6:36 AM: सुटकेचा आदेश कारागृह कार्यालयात पोहोचला.

7:00 AM: तुरुंग अधिकाऱ्यांना अधिकृतपणे आदेश प्राप्त झाला.

8:00 AM: आर्यन खानच्या रिलीजची प्रक्रिया सुरू.

8:15 AM: शाहरुख खान मन्नतहून आर्थर रोड तुरुंगाच्या दिशेने रवाना झाला.

8:55 AM: तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी सुटकेचा आदेश मिळाल्याची पुष्टी केली.

9:30 AM: लाऊड ​​स्पीकरवर आर्यनचे नाव पुकारण्यात आले.

10:30 AM: शाहरुख खानचा बॉडी गार्ड रवी जेलच्या गेटवर पोहोचला.

11:01 AM: आर्यन खान आर्थर रोड जेलमधून बाहेर पडला.

महत्वाच्या बातम्या-

“नेत्यांना आता तोंड लपवून पळावं लागणार”; मोठा गौप्यस्फोट करण्याची घोषणा

“राज्यात शिवसेना- भाजपचं बहुमत होत तरीही पवारांनी सरकार बनवलं, मग हा सत्तेचा दुरूपयोग नाही?”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा वाढ, वाचा आजचा दर

कुत्र्याचा अनोखा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आर्यनच्या सुटकेवेळी चोरट्यांना सुळसुळाट, अबब… ‘या’ गोष्टींची झाली चोरी

“तुम्ही जे केले ते आता तुम्हाला भोगावं लागणार” आर्यनच्या सुटकेनंतर सर्वात मोठी प्रतिक्रिया