मुंबईने लावली महाबोली! IPL इतिहासातील सर्वात महागडा विकेटकिपर मुंबईच्या ताफ्यात दाखल

बंगळुरू | सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून आयपीएलला ओखळण्यात येत आहे. आयपीएल 2022 हंगामाची लवकरच सुरूवात होणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष सध्या बंगळुरूमध्ये चालू असलेल्या आयपीएल लिलावावर (IPL Auction 2022) आहे.

सर्वाधिक किंमत कोणत्या खेळाडूला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आतापर्यंत पार पडलेल्या या लिलावात भारताचा आक्रमक खेळाडू ईशान किशनला मुंबई इंडियन्सनं तब्बल 15 कोटी 25 लाख इतक्या रक्कमेला विकत घेतलं आहे.

आपल्या नेतृत्वात दिल्लीला आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचवणारा आक्रमक खेळाडू श्रेयस अय्यरला कोलकता नाईट रायडर्सनं 12 कोटी 25 लाख रूपयांना विकत घेतलं आहे.

ईशान आणि श्रेयस आतापर्यंत लिलावातील अनुक्रमे एक-दोन क्रमांकाचे महागडे खेळाडू ठरले आहेत. ईशान किशनसाठी हैदराबाद आणि मुंबई संघामध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली आहे.

ईशान किशन हा यापुर्वीही मुंबई संघाकडून खेळत आला आहे. आक्रमक फलंदाजीसह चाणाक्ष विकेटकिपर म्हणून ईशान किशनला ओळखण्यात येतं. मुबई संघ मालक अंबानीच्या चेहऱ्यावर ईशानला संघात समाविष्ट केल्याचा आनंद दिसत होता.

किशनच्या समावेशानं मुंबई संघाची सलामीची चिंता मिटली आहे. रोहित शर्मासह ईशान मुंबई संघाकडून सलामीला खेळताना दिसू शकतो. आजच्या लिलाव प्रक्रियेत ईशानवर सर्वाधिक बोली लागली आहे.

आयपीएलच्या इतिहासातील ईशान सर्वाधिक बोली लागलेला यष्टीरक्षक ठरला आहे. अशात आता त्याच्याकडून मुंबई संघाच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

दरम्यान, मुख्य ऑक्शनर ह्युज एडमिड्स यांची तब्येत आचानक बिघडल्यानं काही वेळ लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली होती. परत ती आता सुरू करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तुमचं आयुष्य कमी तर होत नाही ना?, नॉनव्हेज खाणारांनो एकदा नक्की वाचा

मोठी बातमी! आयपीएलची लिलाव प्रक्रिया थांबली, Auctioneer अचानक खाली कोसळले ; पाहा व्हिडीओ

क्रूझ पार्टी अटकेनंतर पहिल्यांदाच दिसला आर्यन खान, फोटो झाले व्हायरल

मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूला संघात घेण्यात अपयश