‘माझं नाव इरा नाही….’ आमिरच्या मुलीचं नाव चुकीचं उच्चारल्यास बसणार ‘इतक्या’ हजारांचा दंड

मुंबई|  बाॅलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या खूप चर्चेत आहे. त्याचबरोबर आयरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली पहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. यातच ती आता पून्हा एका कारणासाठी चर्चेत आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिरच्या मुलीने आपल्या डिप्रेशन आणि रिलेशनशिपविषयी उघडपणे भाष्य केले. आता ती आपल्या नावामुळे चर्चेत आली आहे. आमिरच्या लेकीला आपण सर्वजण इरा या नावाने ओळखतो. मात्र एक व्हिडिओ पोस्ट करत आता तिने आपले खरे नाव काय आहे हे सांगितले आहे.

एखाद्या सेलिब्रिटीला लाजवेल इतकं फॅन फॉलोइंग आयराचं आहे. जगभरातील लाखो चाहते तिला फॉलो करतात. अन् ती देखील फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. मात्र यावेळी तिनं चाहत्यांबाबत एक तक्रार सांगितली आहे. प्रत्येक जण तिच्या नावाचा उच्चार चुकीचा करतो. अन् त्यामुळं आता तिला मानसिक त्रास होत आहे.  त्यामुळे एक व्हिडीओ पोस्ट करत तिने तिचं खरं नाव काय हे सांगितलं आहे.

आयरा व्हिडीओमध्ये म्हणाली, ‘माझ नाव इरा नाही आयरा आहे. माझ्या मैत्रिणी मला चिडवतात, मला तुम्हाला सांगायचं आहे माझं नाव इरा नाही तर आयरा आहे. आय म्हणजे डोळे आण रा.. आयरा. तुम्ही सगळेच माझं नाव चुकीचं उच्चार करता त्यामुळे माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतात. माध्यमांतही माझं नाव इरा म्हणून संबोधलं जातं. पण ते आयरा आहे.’

एवढंच नाही तर तिनं जर माझं नाव चूकीचं उच्चारलं तर 5000 रुपये दंड पडणार आणि ते 5000 रुपये मी महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी दान करेन. आयराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

आमिरची मुलगी आयराने पडद्यामागे राहून काम करण्यास प्राधान्य दिले आहे. 2019 मध्ये तिने युरीपेड्स मेडिया या नाटकाद्वारे दिग्दर्शनात पाऊल ठेवले. या नाटकात हेजल कीच आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयरा खाननं एक व्हिडीओ शेअर करत ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने तिने मानसिक स्वास्थ सगळ्यांसाठी किती महत्त्वाच असतं या बद्दल सांगितलं होत.

ती लोकांना मानसिक संतुलनाविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न करत आहे. याच कामासाठी आयराला आणखी काही लोकांची गरज आहे. तिनं या कामासाठी काही जागा काढल्या आहेत. त्यासाठी तिला किती कॅंडिडेटची गरज आहे. या बद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने माहिती दिली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

महत्वाच्या बातम्या –

धावत्या ट्रेनसमोर नाचत होता अन् पुढे असं काही घडलं की पाहून…

सावधान! जर तुम्हालाही ‘या’ सवयी असतील तर तुमची…

पुन्हा नव्या डिझाईनमध्ये लाँच होणार ‘ही’ गाडी,…

आता ‘या’ पद्धतीने बदलता येणार फाटक्या नोटा, वाचा…

मोठ्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा चढले; वाचा आजचे…