“नाना पटोलेंना हात लावायची हिंमत नाही, कारण काँग्रेस पाठिंबा काढून घेईल”

मुंबई | काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या आक्रमक शैलीसाठी राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहेत. मात्र याच आक्रमकपणाच्या नादात नानांनी मोठा वाद उभा केला आहे.

नाना पटोलेंनी भंडारा येथील एका सभेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. यावेळी नानांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नाना पटोलेंनी मोेदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राज्यात वाद उभा राहीला आहे. मी मोेदींना मारू शकतो त्यांना शिव्या देऊ शकतो, असं नाना पटोले म्हणाले होते.

नानांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याच्या सुचना पाटील यांनी दिल्या आहेत. परिणामी आता राज्यात मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

राणे साहेबांनी एक थोबाडीत मारतो असं म्हटलं होतं तर त्यांना मोठ्या अडचणी निर्माण करण्यात आल्या. मग नानांनी तर थेट पंतप्रधानांना मारण्याची धमकी दिली आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

राणे यांच्यावर कारवाई केली पण नाना पटोलेंवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही कारवाई करणार नाहीत. कारण काॅंग्रेस पाठींबा काढून घेईल. सगळा खेळ हा खुर्चीभोवती सुरू आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, नाना पटोले यांच्या मोदींवरील टीकेनंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी पोलीस प्रशासन काय कारवाई करतं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “नाना पटोलेंना अटक करा”; वादग्रस्त वक्तव्यावर भाजपची आक्रमक भूमिका

 “झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”

 IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली

किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी