नागपूर | शिवसेना खासदार संजय राऊत दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी राऊत यांनी नागपूरमध्ये जाऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अनेक वक्तव्य केलेली पहायला मिळाली.
राऊतांच्या दौऱ्यापहिलंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या मातीत असे गुण आहे की तिथे गेल्यानंतर संजय राऊत यांना सुबुद्धी येईल असं खोचक वक्तव्य केलं होतं.
फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडल्याचं पहायला मिळालं.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुबुद्धी आली असती, त्यांनी शिवसेनेसोबत मैत्री जपली असती तर कदाचित आज ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नागपूरच्या मातीत राहूनही दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं, असा खोचक टोलाही राऊतांनी फडणवीसांना लगावला.
शिवसेना आपला मित्रपक्ष आहे, शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, आपण त्यांच्या सोबत मैत्रीच्या नात्याने राहिलो पाहिजे अशी सुबुद्धी तुम्हाला त्यावेळी का सुचली नाही?, असा प्रश्नही राऊत यांनी केला.
या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनं राजकीय वर्तुळातील वातावरण जोरदार तापलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या टुकडे टुकडे गँगला शरद पवारांनी आवरावं”
राज्यावर नवं संकट! मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
अतरंगी कपडे घालणाऱ्या राखी सावंतवर गुन्हा दाखल; झालं असं की…
“माझं वैयक्तिक कुठलंही बिल नाही, माझी आई आजारी होती तेव्हा…”
“मी माईकवर टॅप करून सांगितलं होतं…”; जयंत पाटलांचा मोठा खुलासा