नवी दिल्ली | गेल्या दोन महिन्याभरापासून रशिया युक्रेन युद्ध सुरु आहे. या युद्धानं संपूर्ण जगावर गंभीर परिणाम केल्याचं पहायला मिळत आहे.
रशिया युक्रेन युद्धानं खूप नुकसान झालं असून याचा मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवरही पहायला मिळाला.
आता या युद्धाविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रशियाने युक्रेनमध्ये भाड्याचे 20 सैनिक घेतले असून युक्रेनमध्ये सैनिक तैनात करायला सुरुवात केली आहे.
ब्रिटनचे वृत्तपत्र द गार्डियनच्या वृत्तानुसार, रशियाने युक्रेनमध्ये लढण्यासाठी सीरिया, लिबिया आणि इतर देशांतून भाड्याने घेतलेले सैनिक पाठवले आहेत.
शियन कंपनी द वॅगनर ग्रुपने या भाडेकरी सैनिकांना कामावर घेतलं आहे. त्यांच्या रँकनुसार त्यांना दरमहा $600 ते $3000 मजुरी म्हणून दिली जात आहे.
रशियाची आर्थिक कोंडी केली जात असताना देखील रशिया युद्धातून माघार घेण्यास तयार नाही. भाडेकरी सैनिकांना युद्धात आणलं जातं तेव्हा युद्धातील क्रूरता आणखी वाढते.
युक्रेनमधील लोकांवरील क्रूरता आणि अत्याचार वाढवणं हाही रशियाचा उद्देश आहे, असं संरक्षण तज्ज्ञ शैलेंद्र सिंह यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या –
‘शिवसेनेसोबत मैत्री जपली असती तर कदाचित….’; राऊतांचे भाजपला खडेबोल
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या टुकडे टुकडे गँगला शरद पवारांनी आवरावं”
राज्यावर नवं संकट! मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
अतरंगी कपडे घालणाऱ्या राखी सावंतवर गुन्हा दाखल; झालं असं की…
“माझं वैयक्तिक कुठलंही बिल नाही, माझी आई आजारी होती तेव्हा…”