विमानात स्मृती इराणींना महिलेने महागाईवरून विचारले प्रश्न; पाहा विमानात काय काय झालं…

मुंबई | केंद्रात ज्यावेळी काँग्रेस सत्तेत होती. त्यावेळी भाजपने देशभर महागाईविरूद्ध जोरदार आंदोलने केली होती. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील त्यावेळी सिलेंडरच्या दरवाईवरून आणि पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती.

अशातच आता देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. मात्र, भाजप नेते यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत, अशी टीका काँग्रेस करत आहे. अशातच आता आज स्मृती इराणी यांच्यासोबत एक किस्सा घडला.

स्मृती इराणी आज दिल्ली-गुवाहाटी विमानातून प्रवास करत होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या महिला विंगच्या कार्यवाहक प्रमुख नेट्टा डिसोझा यांनी विमानातच स्मृती इराणींना घेरलं. त्यांचा व्हिडीओ डिसोझा काढू लागल्या.

डिसोझा यांनी इराणी यांना इंधन दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरून प्रश्न केले. त्यावेळी इराणींनी त्यांनी व्हिडीओ शूट करण्याचं आवाहन केलं. मात्र, डिसोझा यांनी मोबाईल बंद केला नाही.

यानंतर इराणी यांनी देखील आपल्या मोबाईलमध्ये डिसोझा यांचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर त्यातील काही भाग डिसोझा यांनी ट्विट करत शेअर केला आहे. नेट्टा डिसोझा यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना स्मृती इराणींना टॅग केलं.

एलपीजीच्या वाढत्या किमतींबद्दल विचारले असता, त्यांनी मोफत लसी, राशन आणि गरीबांनाही दोष दिला, असं डिसोझा यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

महत्त्वाच्या बातम्या- 

“कोरोना संपलेला नाही, आता तो पुन्हा…”; पंतप्रधान मोदींचा गंभीर इशारा

कीर्तनकार सेक्स व्हिडीओ प्रकरणात तृप्ती देसाई आक्रमक; थेट गृहमंत्र्यांनाच पाठवले व्हिडीओ

“गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच समजत नाही”

“तुम्ही काय हिंदूत्वाचं पेटंट घेतलंय का?”, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

गालावरचा KISS तिनं ओठांवर घेतला अन्…; अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल