चेन्नईचं टेन्शन वाढलं! …असं झालं तर धोनी IPL 2022 मधून बाहेर पडू शकतो

मुंबई | आयपीएलचा (IPL 2022) मेगालिलाव नुकताच पार पडला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंना यावेळी बोलू लावण्यात आली आहे. त्यामुळे आता आयपीएलची सर्वांनाच उत्सुकता लागला आहे.

यंदा आयपीएलमध्ये 8 नाही तर 10 संघ असणार आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजाएन्ट या दोन संघांना स्थान देण्यात आलं आहे.

चार वेळी आयपीएल विजेता राहिलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज आता नव्या जोशासह मैदानात उतरणार आहे. अशातच आता चेन्नईसाठी चिंताजनक माहिती समोर आली आहे.

महेंद्रसिंह धोनीची पाठी दुखत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना 4 ते 5 आठवडे विश्रांती घेण्यास सांगितलंय. अशा परिस्थितीत धोनी बाहेर राहिला तर तो आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

धोनीच्या पाठदुखीचा त्रास असाच राहिला तर तो यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. धोनी नाही तर मग कोण?, असा सवाल आता उपस्थित होतोय. कदाचित त्याच्या जागी जडेजा कर्णधार होणार अशी देखील चर्चा आहे. याआधीही अनेकदा धोनीला पाठदुखीने खूप त्रास दिला आहे.

दरम्यान, धोनी हा सतत यष्टीरक्षकही राहिला आहे. त्यामुळे जेव्हा तो टीम इंडियासाठी खेळायचा आणि काही सीझनमध्ये चेन्नईकडून खेळायचा तेव्हा पाठदुखीमुळे तो सामना खेळू शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

धक्का नाही धोका म्हणते! ओबीसी आरक्षणावर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

 ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका; विलिनीकरणाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सोडवू” 

घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात दिली जातेय सेक्स फॉर रेंटची ऑफर

फिरायला आलेल्या तरुणीवर तीन मित्रांचा बलात्कार, अत्यंत धक्कादायक घटना