मुंबई | कोरोना महामारीनं गत दीड वर्षापासून संपूर्ण जगाला उद्धवस्त करून टाकलं आहे. अशात आता जगासमोर ओमिक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका उभा राहिला आहे. परिणामी आता सरकार आणि नागरिक यांना काळजी घ्यावी लागत आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ओमिक्राॅनच्या संभाव्य धोक्याबद्दल अधिक माहिती दिली आहे. राज्यात तिसरी लाट आलीच तर ती ओमिक्राॅनमुळं येण्याची शक्यता आहे, अशी भिती टोपे यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारनं वाढत्या ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावले आहेत. या निर्बंधाबाबत अधिक माहिती देण्यारसाठी राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी संभाव्य धोक्याबद्दल माहिती दिली आहे.
फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये ज्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढत आहे. ते पहाता आपण काळजी घेण्याची गरज आहे. सरकारनं सध्या जी नियमावली लागू केली आहे. ती ओमिक्राॅनच्या आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लागू केली आहे.
नागरिकांनी जर निर्बंध नाही पाळले तर रूग्णसंख्या वाढीचा दर वाढायला वेळ लागणार नाही. युरोपियन देशात सध्या रूग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर हा वाढलेला आहे. त्या ठिकाणी दर दीड दिवसाला रूग्णसंख्या दुप्पट होत आहे, असंही टोपे म्हणाले आहेत.
ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत वाढ होण्यासी शक्यता अधिक असल्यानं सध्या राज्य सरकारनं निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी नागरिकांनी या नियमावलीचं पालन करणं गरजेचं आहे, असंही टोपे म्हणाले आहेत.
ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत होणारी वाढ पहाता जर तीसरी लाट आलीच तर ती ओमिक्राॅनची असणार आहे, अशी भिती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. परिणामी सरकार ओमिक्राॅनबाबत गंभीर आहे हे स्पष्ट होत आहे.
परदेशात रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होतं आहे. अशाीच परिस्थिती राहिली तर आपल्या देशातदेखील परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांनी सरकारला सहकार्य करावं असंही टोपे म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना टास्क फोर्ससोबत एक महत्त्वाची बैठक घेतली होती. त्यानंतर राज्य सरकार आपल्या पातळीवर नियमावली लागू करू शकत अशी सुचना केंद्र सरकारनं राज्यांना दिली होती.
दरम्यान, ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारनं पहिल्यांदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं विधानसभेतून राज्यभरात नाईट कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!
“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”
‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर
अत्तरवाल्याकडे सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले, मागवावा लागला कंटेनर