‘गांXX दम असेल तर मला उचलून दाखवा’; प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची देशात सुरू असलेल्या ईडी कारवाईवरून बोलताना जीभ घसरली आहे.

देशात भाजपने दडपशाहीचं राजकारण सुरू केलेलं आहे. उठसुट कोणालाही ईडीच्या नोटीसा दिल्या जात आहेत. भाजपने देशात मोकळ वातावरण ठेवलेलं नाही, अशी टिका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

मलाही ईडीची नोटीस दिली होती. जर गां&#$ दम असेल तर मला उचलून दाखवून कारवाई करावी, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी भाजपला दिलं आहेे.

राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यामध्ये सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलं होतं.

देशभरामध्ये संविधानाप्रमाणे वागायचं नाही, असंच ठरवलेलं दिसतं. संविधानात्मक तरतुदींनुसार निवडूण गेलेल्या प्रतिनिधींमार्फतच राज्य व्हायला हवं, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

सभागृहाचा पाच वर्षांचा कालखंड संपण्याआधीचं निव़डणूक आयोगाने सदस्यांना गठित करणे गरजेचे आहे. दुर्देवाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग्य वेळेत घेतल्या नाहीत, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली .

घटनात्मक चौकट तोडण्याची प्रक्रिया जी केंद्र सरकारपासून सुरू आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाने भर घालू नये, अशी आमची अपेक्षा आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गंभीर प्रश्नांवर भर देण्याऐवजी सर्वोच्च न्यायालय या देशाची चौकट कशी मोडेल यावरचं भर देताना दिसत आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करत आहोत की, घटनेची पायमल्ली होणार नाही, हे पाहावं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

जाहीरातदार बीसीसीआयवर भडकले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

 नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! दाऊद प्रकरणात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

 आयपीएलच्या पुढील हंगामात चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा धोनीच

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘नवरात्री आणि मांसाहार…’; सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ