नवी दिल्ली | उत्तम मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक असते. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीन विश्रांती घेत असतात. काही लोक वेगवेगळ्या कलर्सचे लाईट लावून झोप घेतात. मात्र, यामुळे आरोग्याला मोठं नुकसान होऊ शकतं.
संध्याकाळी आर्टिफिशियल लाईटमध्ये झोपल्याने शरिरावर नकारात्मक परिणाम होतात. यामुळे तुमच्या आरोग्याचं देखील मोठं नुकसान होऊ शकतं. शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासंदर्भात अभ्यास केला आहे.
झोपतांना वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट लावल्यामुळे होणाऱ्या परिणामांवर त्यांनी अभ्यास केला आहे. या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की, आर्टिफिशियल लाईटमध्ये झोपल्याने शरिरातील ग्लुकोजची पातळी वाढते.
चयापचयावर देखील परिणाम होतो. तसेच ह्रदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते. आर्टिफिशियल लाईटमुळे मज्जासंस्था अधिक सक्रिय होते.
आर्टिफिशियल लाईटचा परिणाम जाणून घेण्यासाठी काही प्रयोग लोकांवर प्रयोग करण्यात आला. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर परिणाम जाणवला आहे. जास्त लाईट असणाऱ्या लोकांची झोपेची गुणवत्ता कमी आहे.
कमी प्रकाशात झोपणाऱ्या लोकांच्या झोपेची गुणवत्ता जास्त लाईटमध्ये झोपणाऱ्या व्यक्तींपेक्षा चांगली असल्याचं प्रयोगातून समोर आलं आहे.
आर्टिफिशियल लाईट म्हणजेच कृत्रिम प्रकाश हा मज्जासंस्थेला अधिक सक्रिय करतो हा निष्कर्ष समोर आला आहे. शहरी लोकांमध्ये आर्टिफिशियल लाईट वापरण्याचं प्रमाण अधिक आहे.
दरम्यान, झोपताना कमी प्रकाशामध्ये झोपल्यास झोपेची गुणवत्ता वाढून लोक चांगल्या प्रकारची झोप घेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”
डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव
घर खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुद्रांक शुल्क विभागाने घेतला मोठा निर्णय