पुणे | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाला रोखायचं असेल तर संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.
राज्यात लसीकरण मोहिमेने मोठा टप्पा ओलांडला आहे. अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असली तर अजूनही कित्येक नागरिक आहेत जे कोरोना लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.
आता कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला नसेल तर नागरिकांना थेट क्वारंटाईन करण्यात येणार आहे. लसीचा दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांविरोधात राष्ट्रवादीच्या आमदाराने अजब फतवा काढला आहे.
राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा आदेश काढला आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नसेल तर नागरिकांना क्वारंटाईन करणार असल्याचा इशारा सुनील शेळके यांनी दिला आहे.
मावळमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 100 टक्के असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अनेक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.
त्यामुळे ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांना क्वारंटाईन करण्याचा इशारा सुनील शेळके यांनी दिला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी शेळके यांनी हा फतवा काढला आहे.
सुनील शेळके यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी 15 जानेवारी पर्यंतचा अल्टिमेटम देखील दिला असल्याची माहिती आहे.
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका बघता राज्यात कठोर निर्बंध लादायला सुरूवात झाली आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 18 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा…’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा
‘तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला पण…’; तेजस्विनी पंडित भावूक
माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही…- उद्धव ठाकरे
‘लग्नाआधी सेक्स ही… ‘; दीपिका पादुकोणच्या वक्तव्याने उडालेली खळबळ