Corona: राज्यात तुर्तास तरी लॉकडाऊन नाही पण…

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ बघता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?, अशी भीती व्यक्त केली जात होती.

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात तुर्तास तरी लॉकडाऊन लागणार नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यात सध्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला नसला तरी निर्बंध अधिक कठोर करण्यात येणार आहेत. झपाट्याने वाढणारी कोरोना रूग्णांची आकडेवारी बघता हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्यातरी राज्यभरात निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, येणाऱ्या 15 दिवसांत काय परिस्थिती असेल यावर पुढचे निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

गेल्या 3 दिवसांत राज्यात कोरोना रूग्णसंख्येत दुप्पटीने वाढ होत आहे. वाढती रूग्णसंख्या बघता राजेश टोपेंनी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मास्क न लावणाऱ्या व्यक्तींकडून 500 रूपये दंड घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

राज्यात कोरोना चाचणी वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. तर कोरोना चाचणीसोबतच लसीकरणावरही भर देणं आवश्यक असल्याचं टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात मंगळवारी 18 हजारांपेक्षाही जास्त कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. कोरोनाबाधितांचा आकडा आज 25 हजारांवर जाऊ शकतो, अशी भीती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

लसीचा दुसरा डोस घ्या नाहीतर क्वारंटाईन व्हा, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय

‘पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा…’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

‘तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला पण…’; तेजस्विनी पंडित भावूक

माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही…- उद्धव ठाकरे

‘लग्नाआधी सेक्स ही… ‘; दीपिका पादुकोणच्या वक्तव्याने उडालेली खळबळ