‘पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा…’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींसदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. ओबीसींसदर्भातील वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

माझा ओबीसी समाजावर फारसा विश्वास नाही, असं वक्तव्य आव्हाडांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे.

जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खळबळजनक ट्विट केलं आहे. आपल्या घरावर मोर्चा निघणार असून पोलीसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

पोलीसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा… जय भीम, असा इशारा देखील जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत दिला आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या या ट्विटनंतर त्यांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आव्हाडांच्या घराबाहेर क्युआरटी टीम आणि सिटी पोलीस यांची कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये फक्त मोर्चा निघणार असल्याचं नमूद केलं. हा मोर्चा त्यांच्या ओबीसी संदर्भातील वक्तव्यावरून झालेल्या वादामुळेच निघणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, आव्हाडांनी पोलीस बंदोबस्त करावा अशी मागणी केली. शिवाय त्यांनी ट्विटमध्ये अन्यथा असा उल्लेख करत अप्रत्यक्ष इशारा देखील दिला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला पण…’; तेजस्विनी पंडित भावूक

माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही…- उद्धव ठाकरे

‘लग्नाआधी सेक्स ही… ‘; दीपिका पादुकोणच्या वक्तव्याने उडालेली खळबळ

महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे -देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात आज लॅाकडाऊन होणार?, मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता