मुंबई | सध्या राज्यात ओबींसींच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या वक्व्यावरुन राजकारण पेटल्याचं पहायला मिळत आहे.
क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पहायला मिळत आहे.
ओबीसींवर माझा फार काही विश्वास नाही, कारण जेव्हा मंडळ आयोग आलं तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं, असा घणाघात आव्हाडांनी ओबीसींवर केलेला पहायला मिळाला.
ओबीसींवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. मात्र आता आरक्षणाच्या निमित्ताने का होईना पुढे येत आहेत, असं म्हणत आव्हाडांनी ओबीसींवर निशाणा साधला आहे.
आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सध्या विरोधकांकडून होत आहे.
भाजपा आक्रमक झाली असून जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. त्यामुळे आव्हाडांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे.
घराबाहेर होणाऱ्या आंदोलनावर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो इशारा नव्हता…अन्यथा मी घरातून निघून जाईन असं म्हणणं होतं. तुम्ही त्याला इशारा समजत आहात. मला मारलं बिरलं तर लफडं व्हायचं म्हणून तर मी 9 वाजता घऱ सोडून आलो, असं आव्हाडांनी म्हटलं.
माझ्याबद्दल प्रेम आहे म्हणून कार्यकर्ते जमले आहोत असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचं समर्थन केलं. तुमच्या चाळीत एखादं लफडं झालं आणि तुमच्या अंगावर कोण आलं तर चाळकरी खाली उतरतात ना? असा प्रतिप्रश्नही आव्हडांनी केला.
दरम्यान, राज्यातील वातावरण ओबीसींच्या मुद्द्यवरुन चांगलंच तापलं आहे. यातच आता ओबीसींच्या मुद्द्यावरुन निवडणूमकाही रद्द करण्याची मागणी होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लसीचा दुसरा डोस घ्या नाहीतर क्वारंटाईन व्हा, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय
‘पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा…’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा
‘तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला पण…’; तेजस्विनी पंडित भावूक
माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही…- उद्धव ठाकरे
‘लग्नाआधी सेक्स ही… ‘; दीपिका पादुकोणच्या वक्तव्याने उडालेली खळबळ