राज्यात संपूर्ण लॉकडाऊन नाही पण या सेवांवर कठोर निर्बंध,वाचा सविस्तर

मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरूवात केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?,अशी भीती व्यक्त केली जात होती.

कोरोनाचा झपाट्याने होणार फैलाव बघता मंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली. राज्यात तुर्तास तरी लॉकडाऊन लागणार नसल्याचा महत्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

लॉकडाऊन नसलं तरी राज्यभर कठोर निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात ज्या सेवांवर निर्बंध असणार त्याबद्दलची माहिती राजेश टोपेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

निर्बंध आजच लागतील असं नाही, योग्यवेळी निर्बंध घेऊ.राज्यात तुर्तास तरी लॉकडाऊनची गरज नसली तरी रूग्णसंख्या पाहून निर्बंध वाढवणार, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

क्वारंटाईन कालावधी 7 दिवसांचा करण्यात आल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. तर टास्क फोर्सने ऑग्युमेंटेड रेस्ट्रिक्शनचा मुद्दा समोर ठेवला असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुविधांची फारशी आवश्यकता नाही, अत्यावश्यक सेवांमध्ये ज्याची गणती केली जात नाही अशा पद्धतीच्या सेवा-सुविधा, प्रक्रिया धिम्या गतीनं करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी पावलं उचलली जाऊ शकतात, असा इशारा राजेश टोपेंनी दिला आहे.

ज्या ठिकाणी गर्दी होत आहे, त्या ठिकाणी कठोर नियम लावण्याची गरज असल्याचं वक्तव्य देखील टोपेंनी केलं आहे.

राज्यातील एकंदर परिस्थिती, रोजची वाढती रूग्णसंख्या, आजच्या बैठकीतील सर्व मुद्दे मुख्यमंत्र्यांपुढे सादर करण्यात येतील. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच हे सर्व निर्णय घेतले जातील, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात गेल्या तीन दिवसातच कोरोनाबाधितांची आकडेवारी दुप्पटीने जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. झपाट्याने वाढणारी रूग्णसंख्या बघता राज्यात चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यात तुर्तास तरी लॉकडाऊन नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मात्र, येत्या काही दिवसात प्रशासनाकडून गंभीर पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

Corona: राज्यात तुर्तास तरी लॉकडाऊन नाही पण…

लसीचा दुसरा डोस घ्या नाहीतर क्वारंटाईन व्हा, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय

‘पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा…’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

‘तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला पण…’; तेजस्विनी पंडित भावूक

माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही…- उद्धव ठाकरे