…म्हणून मी लग्नाअगोदर गरोदर असल्याचं लपवलं होतं; नेहा धुपियाने केला खुलासा

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने मनोरंजन विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूड मधील बिनधास्त आणि धाकड अभिनेत्री म्हणून नेहाला ओळखलं जातं. नेहाने अगदी लहान वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

नेहाने अभिनेता अंगद धुपिया याच्याशी 2018 मध्ये गुपचूप लग्न केलं होतं. नेहा लग्नाअगोदरच गर्भवती असल्याने त्यावेळी या दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा चालू होत्या. नेहाने या गोष्टींचा खुलासा एका मुलाखती दरम्यान केला होता.

नेहा आणि अंगदच्या प्रेमाची सुरुवात नेेहा वीस वर्षांची असताना झाली होती. नेहा लग्नाअगोदरच गर्भवती राहिली होती. मात्र, ही गोष्ट तिने तब्बल सहा महिने सर्वांपासून लपवली होती, असा खुलासा नेहाने केला आहे.

याविषयी बोलताना नेहा म्हणाली की, गर्भवती असल्याची गोष्ट मी सहा महिने लपवून ठेवली होती. मी गर्भती असल्याचं समजल्यानंतर कोणीही मला काम देणार नाही. माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातील.

तसेच माझ्याबद्दल चुकीचं मत बनवलं जाईल. याची भिती मला सतत वाटायची, यामुळे मी गर्भवती असल्याची बातमी सर्वांपासून लपवून ठेवली होती, असा खुलासा नेहाने या मुलाखतीत केला होता.

नेहाचा पती अंगद याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नेहा गर्भवती असल्याची बातमी दिली होती. यानंतर चाहत्यांना जणू धक्काच बसला होता. नेहा लग्नाअगोदर गरोदर असल्याने ही गोष्ट आपल्या कुटुंबाला कशी सांगायची, असा प्रश्न नेहा आणि अंगद समोर त्यावेळी उभा राहिला होता.

याबद्दल बोलताना एकदा अंगद म्हणाला होता की, ही गोष्ट माझ्या कुटुंबाला सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मला प्रचंड भिती वाटत होती. मी ज्यावेळी घरी नेहा गर्भवती असल्याची गोष्ट सांगितली त्यावेळी घरचे प्रचंड रागावले. परंतु त्यांनी आमच्या नात्याला मान्यता दिली.

महत्वाच्या बातम्या –

‘बिग बाॅस ओटीटी’: बोलता बोलता शमिता राकेशला म्हणाली “इथे ये आणि आधी मला एक किस कर”, पाहा व्हिडीओ!

ड्रग्स प्रकरणात आता ‘या’ अभिनेत्याच्या घरावर छापा!

हनी सिंगच्या अडचणींत वाढ; घरगुती हिंसाचार प्रकरणी न्यायालयानं फटकारलं, म्हणाले…

भावाच्या मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडलं होतं? ऋषी कपूर यांच्या भावाने केला खुलासा

…म्हणून भरमंडपात नवरदेवासमोरच नवरीने मामासोबत घेतले फेरे; व्हिडीओ व्हायरल