रशिया-युक्रेन युद्ध! रशियन सैनिकांच्या मृत्यूची धक्कादायक आकडेवारी आली समोर

नवी दिल्ली | सध्या जग एका मोठ्या विश्वयुद्धाच्या दिशेनं जात असल्याचं रशिया-युक्रेन युद्धावरून लक्षात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्ध सुरू करून आता सात दिवस झाले आहेत.

दिवसागणिक युक्रेनच्या एका-एका शहरावर रशियाच्या सैनिक ताबा मिळवण्यासाठी मोठा हल्ला करत आहेत. लाखोंच्या संख्येनं रशियाचे सैनिक सध्या युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत.

बलाढ्य रशियन सैन्याशी युक्रेनची सेना झुंज देत आहेत. अनेक ठिकाणी तर रशियन सैनिकांचा पाडाव करण्यात युक्रेनला यश आलं आहे. रशियन सैनिकांचा मोठ्या प्रमाणात मुकाबला करण्यात युक्रेन यशस्वी ठरत आहे.

युक्रेनकडून रशियाचे हजारो सैनिक मारल्याचा दाव करण्यात आला असताना आता रशियानं अधिकृत माहिती जाहीर केली आहे. युक्रेनविरोधात लढाई सुरू झाल्यापासून रशियन सैनिक आपल्या ताकतीचं प्रदर्शन करत आहेत.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सैनिकांच्या लढाईतील कामगिरीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. आतपर्यंत या लढाईत रशियाचे 498 सैनिक मृत्यू पावले आहेत तर तब्बल 1600 सैनिक जखमी झाले आहेत.

रशियन लष्करानं युक्रेनवर ताबा मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. रशियाला सर्वात महत्त्वाची युक्रेनची राजधानी कीव हे शहर आहे. युक्रेनचा सर्व कारभार आणि लढाईची रणनिती सध्या कीवमधून आखली जात आहे.

रशियन सैन्य कीव शहरावर सर्वात मोठा हल्ला करण्याची तयारी करत आहे. युक्रेनकडून रशियाचे तब्बल 4 हजारांहून अधिक सैनिक मारल्याचा दाव करण्यात आला आहे. तर युक्रेनचे 102 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं युक्रेननं म्हटलं आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुंळ सर्वांना चिंतेत टाकलं आहे. दोन्ही देशांनी युद्ध थांबवावं यासाठी सध्या चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. संयुक्त राष्ट्र संघानं रशियावर विविध प्रतिबंध लादण्याची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”

आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज

  “सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”

  आनंदाची बातमी! महाराष्ट्रात आज कोरोनानं एकाचाही मृत्यू नाही 

 मोठी बातमी! रशियन सैनिकांनी युक्रेनच्या दोन मोठ्या शहरांवर मिळवला ताबा