नवी दिल्ली | कोरोना महामारीनं अवघ्या जगामध्ये मोठी हानी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. चीनमध्ये सध्या परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
चीनमधील महत्त्वाचं शहर असणारं शांघायमध्ये कोरोना रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. परिणामी अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोना पसरण्याची शक्यता असल्यानं भारतात देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
चीनमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली आहे. बैठकीत कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देण्याचे आदेश मांडवीय यांनी दिले आहेत.
जिनोम सिक्वेंसिगवर भर देण्यावर देखील चर्चा झाली आहे. देशात चीनमधून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परिणामी कोरोनाबाबात सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.
कोरोना नियमावलीचं पालन करण्यासाठी शांघाय शहरामध्ये चीन सरकारकडून कठोर नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. चीनमध्ये आढळलेला ओमिक्राॅनचा बीए 2 हा व्हेरियंट आहे.
चीन सरकारने शांघाय आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. याचा फटका भारतातील प्रवासी वाहतुकीला देखील होणार आहे.
चीनमध्ये कोरोना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रूग्णसंख्या 5 हजारांच्या पुढं गेली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत शांघाय टाॅवरला बंद करण्यात आलं आहे.
दरम्यान, मोदी सरकार सातत्यानं परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं मत मांडवीय यांनी व्यक्त केलं आहे. नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं माडवीय म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये केमिकल वाॅर होणार???, जगाचं टेन्शन वाढलं
“CD होती पण वेळ नव्हती, आता CD बाहेर काढणार”; एकनाथ खडसेंचा पुनरूच्चार
Holi: होळीत केसांची घ्या खास काळजी; ‘या’ पाच ट्रिक नक्की वापरुन पाहा
Russia Ukraine War: “जेव्हा इतिहास लिहिला जाईल…”, रशियाने भारताला दिलेल्या ऑफरमुळे अमेरिका नाराज
फडणवीसांच्या टीकेला विधानसभेत अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…