दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक, विषयतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना रूग्णसंख्या आता कमी होत असल्याने आता परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र, उपकेंद्र या पद्धतीने नियोजन करण्यात आल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरं जावं, कोरोनाचे सर्व नियम पाळूनच परीक्षा घेतल्या जातील, असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

दरम्यान, बारावी आणि दहावीच्या परीक्षांसाठी 22969 अतिरिक्त परीक्षा उपकेंद्रांची संख्या करण्यात आलीये. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नसल्याचं पहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तुम्ही थोडं शांत रहा, विराट नक्की चांगली कामगिरी करेल”

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”