शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांनो… उद्यापासून मार्केटमध्ये ‘हा’ मोठा बदल होणार!

मुंबई | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचं तसेच ट्रेडिंग करणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अनेकांना आपापलं डिमाॅट अकाऊंट सुरू केल्याने गुंतवणुकीकडील ओघ वाढल्याचं चित्र आहे.

अशातच आता ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उद्यापासून म्हणजेच 18 एप्रिलपासून सकाळी 10 ऐवजी सकाळी 9 वाजता व्यापार सुरू होईल, अशी अधिसुचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कोरोनावरील निर्बंध हटवले होते. त्यानंतर आता फायनान्स मार्केट 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे. दुपारी साडेतीन पर्यंत मार्केट ओपन राहणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने वित्तीय बाजारपेठेतील व्यापाराचे तास बदलले आहेत. 18 एप्रिलपासून बाजाराचे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. परकीय चलनाचा बाजार आणि सरकारी रोख्यांमधील व्यवहार आता पुन्हा सुरळीत होणार असल्याचं देखील आरबीआयने म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना काळात सर्वांनाच फटका बसला होता. शेअर मार्केटमध्ये देखील या काळात भीतीचं वातावरण होतं. त्यामुळे आरबीआयने त्यावेळी वेळापत्रकात बदल केले होते. त्यानंतर आता पुन्हा वेळेत बदल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव”, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

“मला पुण्यातून बाहेर पडायचंय, पुण्यावर भयंकर संकट कोसळलंय”, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

पुढील 5 दिवस महत्त्वाचे! ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

“राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंची जागा घेणार”

‘आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत’; राज ठाकरेंचा इशारा