लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण: आमदार गणेश नाईक यांना अटक होण्याची शक्यता!

मुंबई | ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरूद्ध आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एका महिलेने गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप असल्याचा दावा केला होता. तर गणेश नाईक यांनी तोंड बंद ठेवण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप महिलेने केला आहे.

सध्या राज्यभर या प्रकरणाची चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरूद्ध जीवे ठार मारण्याची धमकी आणि इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिडीत महिलेने राज्य महिला आयोगाकडे या संबंधी तक्रार दिली होती. या प्रकरणात महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना तपास करुन 48 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गणेश नाईक यांना अटक करून त्यांची चौकशी केली जाईल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आता गणेश नाईक यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारण देखील तापण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांनो… उद्यापासून मार्केटमध्ये ‘हा’ मोठा बदल होणार!

“दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव”, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

“मला पुण्यातून बाहेर पडायचंय, पुण्यावर भयंकर संकट कोसळलंय”, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

पुढील 5 दिवस महत्त्वाचे! ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

“राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंची जागा घेणार”