मुंबई | कोरोना व्हायरसच्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे.
युरोपमध्ये तर ओमिक्रॉननं धुमाकूळ घातला आहे. भारतातदेखील याचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंतओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 400 पार गेली आहे.
रूग्णसंख्या वाढत असताना ओमिक्रॉनसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिसरी लाट आलीच तर मधुमेह व इतर गंभीर आजार असणाऱ्यांनाच अधिक धोका होऊ शकतो, असं क्रिम्स हॉस्पिटलचे प्रबंध संचालक डॉ. अशोक अरबट यांनी म्हटलं आहे.
तिसरी लाट आलीच तरी ती मुलांवर आघात करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, इतरांसाठीही ती फार घातक ठरणार नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी राहील, असंही डॉ. अशोक अरबट म्हणालेत.
ओमिक्रॉनचा जो आजवर अभ्यास झाला तो अतिशय सौम्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढली तरी त्यामुळे फार नुकसान संभवत नाही. दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या अधिक होती, असं त्यांनी सांगितलंय.
दरम्यान,कोरोनाचा (Corona) नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन(Omicron) राज्यात आपले हातपाय पसरत चालला आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
राज्यात 26 ओमिक्रॉनचे (Maharashtra Omicron) रुग्ण आढळून आले आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक 11 रुग्ण आढळले आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा 2 रुग्ण आढळले आहे. राज्यात आता ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण!
‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; Omicron चं सुरुवातीचं लक्षण आलं समोर
मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करता येणार नाही, पालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“…तर राज्य सरकार राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकतं”
फुकट दिलं तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे, त्यामुळे…- नितीन गडकरी