…तर राज्य सरकारलाही राजकीय पावलं टाकावी लागतील- संजय राऊत

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा जुंपली आहे. या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

घटनेतील तरतुदींनुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणूक केलेली असते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी आणि लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांना नियुक्त केलेले नसते, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं उत्तर सर्वांसमोर आहे. राज्यपालांनी फार अभ्यास करू नये असं मी आधीच म्हटलं आहे, असा खोचक टोला देखील संजय राऊतांनी लगावला आहे.

राज्यपाल हे अभ्यासू आणि विद्वान आहेत. मात्र, ही विद्वत्ता अजीर्ण होता कामा नये. सध्या राजभवनात अभ्यास आणि विद्वत्ता अजीर्ण होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पोटाचे त्रास सुरू होतात, असा टोला संजय राऊतांनी लगवाला आहे.

जर पोटाचे असे त्रास होत असतील तर महाराष्ट्राचे आरोग्य खाते सक्षम आहे, असा चिमटा देखील संजय राऊत यांनी काढला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे घटनेच्या विरूद्ध वागत असतील. राजकीय वर्तन करण्यासाठी त्यांच्यावर दबाव असेल तर राज्य सरकारलाही राजकीय पावलं टाकावी लागतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिथे आहेत तिथून अधिवेशन योग्यप्रकारे नियंत्रित करत आहेत, अशी माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवडणुका झाल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो, असं मत कायदेतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

राज्यपालांच्या परवानगीशिवाय विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्याची चर्चा महाविकास आघाडी सरकारमध्ये रंगली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

रोहिणी खडसेंच्या कारवरील हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण!

कामावर रूजू न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांविरोधात सरकार आक्रमक; केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; Omicron चं सुरुवातीचं लक्षण आलं समोर

मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करता येणार नाही, पालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय