SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता कार्ड हरवलं तर…

मुंबई | डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आजकाल सांभाळणं गरजेचं झालं आहे. अनेक महत्त्वाचे आर्थिक व्यवहार कार्डवरच केले जातात. अशातच डेबिट कार्ड हरवणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

डेबिट कार्ड ब्लाॅक करण्यासाठी एसबीआय ग्राहकांसाठी चार पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचं हरवलेलं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ब्लाॅक करू शकता.

टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून एसबीआय डेबिट कार्ड ब्लॉक करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. एसबीआयच्या 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तुम्ही तुमचं कार्ड ब्लाॅक करू शकता.

या क्रमांकावर संपर्क केल्यावर तुम्हाला बँकेचे अधिकारी काही माहिती किंवा सुचना करतील. त्या तुम्ही पाळणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता.

www.onlinesbi.com या वेबसाईटवर लॉग करून ई सर्व्हिसेसवर क्लिक करून एटीएम कार्ड सर्व्हिसेस बंद करू शकता.

कार्डचे पहले चार आणि शेवटचे चार डिजिट दिसतील त्यावरून तुम्ही तुमचं कार्ड ओळखू शकता. कार्ड ब्लॉक झाल्यानंतर तुम्हाला तिकीट नंबरसह एक मेसेज मिळेल, त्याला तुम्ही नवीन कार्डसाठी जपून ठेऊ शकता.

एसएमएस पाठवून देखील तुम्ही तुमचं एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता. 567676 या क्रमांकावर BLOCK XXXX असा मेसेज पाठवावा लागेल. XXXX च्या जागी तुम्हाला कार्डचे शेवटचे टाकायचे असतात.

रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल नंबरवरूनच तुम्हाला मॅसेज पाठवावा लागेल. त्यानंतर खात्रीसाठी एक मॅसेज येईल. त्यानंतर तुम्हाला कार्ड बंद करता येऊ शकेल.

बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन कार्ड ब्लॉक करता येऊ शकतं. अधिकारी देतील त्या सुचनांचं पालन करून लवकर तुम्ही कार्ड ब्लाॅक करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं, मी टरबुज्या म्हणणार नाही पण…”

“आम्ही मराठ्यांच्या पोटचे नाही का?, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का?”

ठरलं तर! भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी

‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर