सीमेवर लढताना अवघ्या 23 व्या वर्षी सांगलीच्या सुपुत्राला वीरमरण; संपूर्ण देश हळहळला

सांगली | जम्मू कश्मीरमध्ये अनेक जवान देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देत असतात. देशाच्या रक्षणासाठी आपला जीव ओवाळून टाकतात.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये चकमक घडली होती. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवानही शहीद झाले.

जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावर कारवाई करत असताना अचानक गोळीबार झाला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी घेरेबंदी केली. मात्र दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला.

या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण यांना देशसेवा बजावताना वीरमरण आलं. त्यांचं वय फक्त 23 वर्ष होतं.

रोमित तानाजी चव्हाण हे राष्ट्रीय रायफलचे जवानचे जवान होते. पाच वर्षांपूर्वी रोमित मुंबई येथे सैन्य दलात भरती झाले होते.

त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचं ट्रेनिंग झालं होतं. वर्षांभरापूर्वी जम्मू काश्मीर येथे 1 राष्ट्रीय रायफल मध्ये पोस्टिंग झालं होतं.

दरम्यान, रोमित चव्हाण यांच्या जाण्याने आता शिगावात शोककळा पसरली आहे. पार्थिव रविवारी संध्याकाळपर्यंत गावात येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता कार्ड हरवलं तर…

“मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं, मी टरबुज्या म्हणणार नाही पण…”

“आम्ही मराठ्यांच्या पोटचे नाही का?, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का?”

ठरलं तर! भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी

‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले