रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आता प्रवास करताना पाळावे लागणार ‘हे’ नवे नियम

नवी दिल्ली | रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. रेल्वे प्रवाशांच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत.

रेल्वेकडून हे नियम रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या बऱ्याच प्रवाशांना रेल्वेतील इतर प्रवाशांचा त्रास होतो. अशा अनेक तक्रारी रेल्वेला प्रवासी देतात.

या तक्रारींमुळे रेल्वेनं आधीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. रात्रीचा प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांचा प्रवास सोईस्कर व्हावा, यामुळे या नियमांमध्ये बदल केलेला आहे.

रात्रीच्या वेळी प्रवासी मोबाईलवर मोठ्याने बोलू शकत नाहीत. तसेच मोठ्याने गाणी ऐकू शकत नाहीत, असे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

तसेच रात्री 10 नंतर सगळे लाईट बंद करण्यात येतील आणि फक्त नाईट लाईट ठेवण्यात येणार आहे. रात्री उशीरापर्यंत गप्पा मारता येणार नाहीत.

या नियमांचे उल्लंघन केल्यावर रेल्वे त्या व्यक्तींवर कारवाई करणार आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. हे नियम लवकरच लागू करण्यात येतील.

रेल्वे प्रवाशांच्या तक्रारी लगेचच सोडवणार आहे. जर प्रवाशांच्या तक्रारींवर उपाययोजना झाल्या नाहीत तर त्यासाठी कर्मचारी जबाबदार असतील.

दरम्यान, रेल्वेनं याबाबतचे सर्व आदेश प्रत्येक विभागाला दिले आहेत. त्यामुळे यावर लवकरच अंमलबजावणी करणार असल्याच्या सूचना रेल्वेनं दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Petrol Diesel Price: देशात सर्वाधिक पेट्रोल दर ‘या’ भागात, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

“सशक्त सरकारने सशक्त कारवाई करणे अपेक्षित आहे”; वरूण गांधींचा सरकारला घरचा आहेर

  ‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

  Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”

  येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा