Petrol Diesel Price: देशात सर्वाधिक पेट्रोल दर ‘या’ भागात, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

नवी दिल्ली | देशभरात पेट्रोल डिझेलचे दर नेहमीच कमी-जास्त होत असतात. मात्र गेल्या तीन महिन्यापासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकत्तामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. आजही या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर असलेले पहायला मिळतात.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढताना दिसत आहेत. मात्र, निवडणुकीच्या दबावामुळं सरकारी तेल कंपन्याचे पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

मुंबईत पेट्रोलचा दर 110 रुपये प्रती लिटर आहे. हा देशातील सर्वाधिक पेट्रोलचा दर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रुड ऑइलचा दर सर्वात जास्त आहे. रशिया आणि युक्रोनमध्ये युध्दजनक परिस्थिती पाहता क्रुड ऑइलचा दर सतत वाढताना दिसत आहे.

HPCL, BPCL आणि IOC या मार्केटिंग कंपन्या रोज सकाळी 6 वाजता नवीन पेट्रोल डिझेलचे दर जाहीर करत असतात. एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टींमुळे पेट्रोल डिझेलच्या दरांची किंमत दुपट्ट होते.

दरम्यान, दिल्ली, चेन्नई आणि कोलकत्ता या महानगरांमध्ये पेट्रोल दर 95-100 च्या आसपास आहेत.मात्र मुंबईत हा दर 110 पर्यंत गेलेला आहे.

कोरोना काळात अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. कोरोना काळात सगळ्याच गोष्टींच्या किंमतीत वाढ पहायला मिळाली. महागाईनं तर उच्चांकच गाठल्याचं चित्र होतं.

केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली होती. या कपातीनंतर काही शहरांमध्ये इंधनाचे दर 100 रुपयांपेक्षा कमी झाल्याचं पहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “सशक्त सरकारने सशक्त कारवाई करणे अपेक्षित आहे”; वरूण गांधींचा सरकारला घरचा आहेर

  ‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

  Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”

  येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

  राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचं सावट, ‘या’ ठिकाणी अनेक पक्षांचा मृत्यू