मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.
देशांमधील तणाव वाढल्यामुळे सध्या पेट्रोल डिझेलवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे इंधन दरात चढउतार होत असेलेली पहायला मिळत आहे.
आज ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार असल्याची बातमी समोर आली आहे.
राज्यभरातील पंप चालकांनी ‘पेट्रोल-डिझेल नो परचेस’ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे आज 31 मे पासून पंप चालक ऑईल कंपनीकडून इंधन खरेदी करणार नाहीत.
देशभरातील इंधन दराच्या मुद्यावरून पेट्रोल पंप चालक-मालकांनी हा निर्णय घेतला असून पेट्रोल पंप मात्र सुरु राहणार आहेत.
आज जरी पेट्रोल पंप चालकांची खरेदी बंद असली तरी पेट्रोल पंप सुरु राहणार असल्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचं कारण नाही.
दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क घटविण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. पेट्रोलवर आठ रुपये घटविण्यात आले असून डिझेलचे दर सहा रुपयांनी कमी करण्यात आले आहे
महत्त्वाच्या बातम्या –
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी ! नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ, समोर आली ‘ही’ माहिती
“आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही”
कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!