रोहित पवार म्हणतात, “नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणं चुकीचं, टेलिप्रॉम्प्टरशिवाय…”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची सर्वत्र चर्चा सुरू असते. जगभरात अनेक ठिकाणी अनेक मंचावर नरेंद्र मोदींनी भाषणं केली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात भाषण देत होते. या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या लाटेचाही उल्लेख केला.

यावेळी भाषणात बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्यावेळी अचानक टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गोंधळ उडाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग बोलता बोलता अचानक थांबले आणि त्यांनी त्यानंतर आवाज येतोय का?, असा सवाल केला. त्यानंतर मोदींच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

तर सोशल मीडियावरदेखील मोदींची खिल्ली उडवली जात आहे. तर काँग्रेसने याच मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला होता. तर राहुल गांधींनी देखील मोदींवर टीका केली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

इकॉनॉमिक फोरमच्या ऑनलाइन बैठकीत काल बोलत असताना टेलीप्राॅम्प्टर बंद बडल्यानं पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय, असं रोहित पवार म्हणाले.

अनेकजण हा व्हिडीओ व्हायरल करत खिल्ली उडवत आहेत. पण मला वाटतं अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय मंचावर मुद्द्यांवर बोलताना पंतप्रधान टेलीप्राॅम्प्टरची मदत घेतात. मात्र, सध्या हाच टेलीप्राॅम्प्टर चर्चेचा विषय बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऐन हिवाळ्यात गारपिटीचं सावट! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”