MIM चा पाठिंबा कोणाला?; इम्तियाज जलील यांनी स्पष्ट सांगितलं

मुंबई | राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला (Rajya Sabha Election) थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत एक-एक मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपला उमेदवार विजयी करण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. अशात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत रात्री चर्चा झाली. त्या चर्चेत एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही मागण्या समोर ठेवल्या.

आपल्या मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात या मागण्या होत्या. या मागण्या पूर्ण होत असल्यास आम्ही मविआला मतदान करु. त्यानंतर आज सकाळी इम्तियाज जलील यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर आम्ही काही बांगड्या घातल्या नाहीत, बाकी काही पेटलं तरी चालेल” 

‘या’ आमदाराने शिवसेनेचं टेंशन वाढवलं; पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर 

“देश नही झुकने दुंगा विसरलात का?, भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा” 

खळबळजनक! न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेल्या खासदाराचा घरी सापडला मृतदेह 

“आता माझा नंबर असेल, कारण जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला…”