‘खऱ्या अर्थाने शरद पवारांनीच एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला’; पडळकरांची घणाघाती टीका

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचं विलगीकरण राज्यशासनात करत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यावेळी प्रत्येक विभागातील कर्मचारी आणि महिला प्रतिनिधींनी यावेळी त्यांच्या समस्या यावेळी फडणवीस यांच्यासमोर मांडल्या आहेत.

त्यावेळी भाजप पूर्णपणे एसटी कर्मचार्‍यांच्या पाठिशी असल्याचं आश्वसान देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी फडणवीसांची भेट घेतली.

त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. शरद पवार यांनी गेल्या 50 वर्षापासून खऱ्या अर्थाने एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला आहे, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

पवारांची एकमेव संघटना ही मान्यताप्राप्त आहे. मात्र, राज्य फक्त मान्यताप्राप्त संस्थेसोबत चर्चा करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे मुळ प्रश्न आतापर्यंत कधीच मांडले गेले नाहीत, असंही पडळकर म्हणाले आहेत.

एसटी कामगारांचे प्रश्न सुटले तर संघटना उरणार नाही आणि मग निवडणुकीच्या वेळी या कामगारांचा वापर करता येणार नाही, अशी घणाघाती टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

जोपर्यंत विलीनीकरणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असं देखील पडळकरांनी इशारा दिला आहे. सरकार कर्मचाऱ्यांना भीती दाखवण्याचं काम करत आहे, अशी टीका देखील पडळकरांनी केली आहे.

बुलढाण्यात एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. एका कर्मचाऱ्याचा भीतीने मृत्यू झाला. एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू वाढतच आहेत. त्यामुळे तत्काळ चर्चा करून समस्या सुटल्या पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

एसटी कर्मचार्‍यांच्या विविध समस्यांबाबत आज अनिल परब यांच्याशी सुद्धा मी चर्चा केल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.  फार काळ संप सुरू राहणे चांगले नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून या समस्या निकाली काढाव्यात, असा सल्ला देखील फडणवीसांनी अनिल परब यांना दिला आहे. तर आम्ही मदत करू, असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला, आता आम्हीही उतरावं का?”

 “नियती माफ करणार नाही, प्रत्येक सेकंदाची किंमत भाजपला चुकवावी लागेल”

 अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई

  भर सामन्यात चहर आणि गप्टीलची नजरेची खुन्नस, पाहा व्हायरल व्हिडीओ

  “संजय राऊत यांना मी माझा पगार देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं”