ग्रीन झोन असलेल्या बीडमध्ये कोरोनाचा शिरकाव; पाहा कोरोना कुठून कसा आला…

बीड |   महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत कोरोनाने आपली पाळेमुळे घट्ट रोवली असताना बीड जिल्ह्यात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत नव्हता. किंबहुना गेले अनेक दिवस बीड ग्रीन झोनमध्ये होता. मात्र आता काल रात्री बीड जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रूग्ण मिळाले आहेत.

परवानगी न घेता दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि पुण्याहून गेवराई व माजलगमध्ये आलेल्या प्रत्येकी एका व्यक्तीला बाधा झाल्याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा आला आहे. त्यामुळे बीडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

लॉकडाऊन असल्याने अनेक जण राज्याच्या विविध शहरांत अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या मूळगावी परतण्याचे वेध लागले आहेत तर कुणी परवानगी न घेता अवैधरित्या प्रवास करत आहेत. बीड जिल्ह्यात कोरोनाने बाधित झालेले हे दोन रूग्ण देखील परवानगी न घेता बीड जिल्ह्यात आले होते.

दरम्यान, दोन्ही कोरोनाबाधित रूग्णांना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन्ही बाधित रूग्ण किती लोकांच्या संपर्कात आले आहेत याचा शोध प्रशासनाकडून सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कुणी 5 कोटी दिलेत, कुणी 500 कोटी… आम्ही आमचं आयुष्य देतोय; मुंबई पोलिसांचं भावूक ट्विट

-“खडसेंना बाजूला करण्यात यांचा डाव; राज्यातील भाजप नेत्यांमध्ये तेवढी ताकद आणि हिम्मत नाही”

-अहो, त्याचा 1 वर्षाचा मुलगा गेलाय हो… ढसढसा रडणारच की!

-“मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही परप्रांतीय हातात, शेठ मंडळींची जागा घेतली पाहिजे”

-माझा राजकीय वारसदार हा माझा कार्यकर्ता असेल, घरातील कुणी नाही- नितीन गडकरी