Uncategorized

सारखा छेड काढत होता तरुण; निर्जनस्थळी बोलावून तीनं त्याचं गुप्तांगच कापलं

डोंबिवली | गावा-शहरांमध्ये मुलींना अनेक तरूण त्रास देत असतात हे वास्तव आहे. या त्रासाला नाहक अनेक मुलींना सामोरं जावं लागतं. या साऱ्या प्रकाराविरोधात काही मुलींच्या तोंडातून अवाक्षरही निघत नाही. तर काही मुली ‘त्या’ मुलांना योग्य तो धडा शिकवत असतात. मात्र डोंबिवलीत काहीसा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राग अनावर होऊन त्या तरूणीने तरूणाला धडा शिकवायच्या नादात भलतंच काहीतरी कृत्य केलं आहे.

काय आहे नेमकी घटना ??

एक तरूण सारखी छेड काढतो, त्रास देतो तसेच वारंवार लज्जा निर्माण होईल असे वर्तन करतो म्हणून ती महिला संतापली होती. त्या तरूणाला धडा शिकवण्याचं त्या महिलेने ठरवलं. ती संतप्त महिला आपल्या दोन मित्रांना घेऊन निर्जन स्थळी गेली. त्या निर्जन स्थळी त्या तरूणाला बोलावलं. आपल्या दोन मित्रांच्या सहाय्याने त्या महिलेने तरूणाचे गुप्तांग कापून काढल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. 

तरूण गंभीर जखमी –

या तरूणीच्या आणि तिच्या मित्रांच्या हल्ल्यात तुषार पुजारे हा गंभीर जखमी झाला असून डोंबिवलीतील एका खासगी रूग्णालयात त्याला दाखल केले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

काय केलीय पोलिसांनी कारवाई??

घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी महिला आणि तीचे दोन्ही मित्र प्रतिक केनीया आणि तेजस म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना बुधवारी कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे.

IMPIMP