मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर

मुंबई | दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक, विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या काळात होतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे.

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी ही माहिती दिली आहे. प्रात्याक्षिक परीक्षा दोन कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली.

मंडळाकडे दहावीसाठी 16 लाख 25 हजार 311 अर्ज आले आहेत. तर बारावी 14 लाख 72 हजार 562 अर्ज आल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. आपल्या मंडळाच्या परीक्षेचं स्वरुप हे वस्तूनिष्ठ, लघूत्तरी आणि दिर्घोत्तरी असं असतं.

बारावीसाठी आपल्याकडे 158 विषय असतात. विज्ञान शाखेसाठी 4 माध्यमातून परीक्षा होते. कला आणि वाणिज्य माध्यमातून 6 माध्यमातून परीक्षा होते. 158 विषयांसाठी 356 प्रश्न पत्रिका असतात. दहावीसाठी 7 विषय आणि 8 माध्यम असतात त्याच्या 158 प्रश्नपत्रिका असतात. राज्यात पावणे दोन लाख कर्मचारी परीक्षा देतात.

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्तात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.

महत्वाच्या बातम्या- 

“वाईन दारू नसेल तर मरणाऱ्या आईला ती गंगाजळऐवजी पाजाल का?” 

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”

अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका, म्हणाल्या…