Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

नवी दिल्ली | आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्ष अशा चेहऱ्याच्या शोधात आहेत ज्यावर सर्व विरोधी पक्षांचं एकमत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सर्वात योग्य मानले जात होतं. मात्र पवारांनी उमेदवार होण्यात रस नाही असं स्पष्ट केलं आहे.

विरोधकांकडून आता शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर डाव्या नेत्यांनीही पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे.

भाजपच्या विरोधात मजबूत संयुक्त उमेदवार उभे करण्याच्या कसरतीत विरोधक व्यस्त आहेत. आतापर्यंत या शर्यतीत शरद पवारांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्या उमेदवारीला अनेक लहान-मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिला. पण खुद्द शरद पवार ही निवडणूक लढवण्यास नकार दिलाय.

ममता बॅनर्जी यांच्या आवाहनानुसार होणाऱ्या या बैठकीला सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते ममता यांच्या या एकतर्फी उपक्रमाच्या बाजूने नव्हते. पण ते एकत्र विरोधी पक्षाचा संदेश देण्यासाठी या बैठकीत सहभागी होतील, असं सांगण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुढील 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता 

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज्यपालांना ऑफर, म्हणाले… 

“मुख्यमंत्री फडणवीस बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा बोलले नाहीत” 

‘ग्लासात ग्लास 36 ग्लास…’; सदानंदरावांसाठी सुप्रिया सुळेंचा वटपौर्णिमा विशेष उखाणा